|
तुकड्या-तुकड्यांनी जग पाहिलं, वाचलं, समजण्याचा प्रयत्न केला. आणि अजूनही करतो आहे.हा प्रयत्न करता करता अर्ध्यावर आयुष्य संपून गेलं. हे जग आपल्याला आता समजलंच असं वाटतं आणि दुसर्याच क्षणी आपल्याला अजून ते जराही समजलेलं नाही आहे याची जाणीव होते. हीच "...बाकी शून्य"ची जाणीव आहे का? खरंच बाकी फक्त एक शून्य उरलेलं आहे का? तुकडा-तुकडा आकाशात मारलेली प्रत्येक भरारी तुकडे-तुकडे झालेल्या घरट्यातच संपावी हेच प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं सार्थक आहे का? तसं नसावं. आयुष्याचं सार्थक भरारीत आहे - घरट्यात नाही. आपण आपल्या भरार्या मारत रहाव्यात - यशाचा, अंतिम निर्वाणाचा सूर्य पंजात गवसेल - न गवसेल. पण भरारी मारणं मात्र सोडू नये.
ही कथा अशाच एका वेड्या भरारीची. |