![]() |
माझ्यासोबत आलेल्या त्या वृद्धानं हाताचं बोट पुढं करून एक जागा दाखवली. या गावाचं पहिलं घर तिथं होतं. त्यानं हात केला तिथं आता पाण्यातून वर आलेला एका झाडाचा शेंडा फक्त दिसत होता मला. ते झाड मी आधीही पाहिलं होतं. भरगच्च. अगदी फेर धरून उभ्या रहाव्या तशा त्याच्या फांद्या वर्तुळाकार वाढलेल्या होत्या. आधी सरळ रेषेत जमिनीला समांतर आडव्या गेलेल्या आणि मग किंचित झुकून जमिनीच्या दिशेनं आलेल्या. त्यामुळं लांबून पाहिलं की, झाडाची गोलाई नजरेत भरून जायची. |