फुकट फौजदार का निर्माण होतात?

मी शाळेत असताना आमच्या शहरात एक मुलगा होता. त्याला रस्त्यावरची रहदारी नियंत्रित करण्याची फार आवड होती असे वाटते. गर्दीत उभा राहून तो सायकलवाल्यांना, हातगाडीवाल्यांना इकडून जा तिकडून जाऊ नका असे सांगत तासनतास रस्त्यात थांबायचा. पुढे हा त्याचा व्यासंग / रोग वाढत गेला असावा. नंतर प्रौढपणी पोलिसांनी त्याला आर एस पी चा पोशाख देऊन चौकात उभे करून त्याच्या हौशीस/वेडास मार्ग करून दिल्याचे दिसले.

माझा प्रश्न असा आहे की, असे का होते? रस्यावरची रहदारी नियंर्त्रित करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे त्याला का वाटले असावे? ह्या त्याच्या विचारांचा त्याच्यावर एवढा पगडा का बसला असावा? त्याला प्रोत्साहन दिल्यामुळे की विरोध केल्यामुळे? (अर्थात शेवटी त्याला हवे होते ते त्याला मिळालेच असे त्याला वाटले असावे (असे मला वाटते!) म्हणजे त्यात त्याला यशही आले.

फुकट फौजदार म्हणजे काय? फुकट फौजदार असेच निर्माण होतात का? व्हावेत का? पुढे नेते बनण्यासाठी विविध क्षेत्रात अशी फुकट फौजदारी केलेली फळास येते का?

तुमचा काय अनुभव / विचार आहे?