स्पर्शू दे की कोमल ओठांना

स्पर्शू दे की कोमल ओठांना
दुसरे न काही, हा प्याला असे
देवाकडुनी सुंदर सर्वांहुनी
पुरस्कार मज हा मिळाला असे ।ध्रु।

लाजेने वाया ना जावे
क्षण यौवनाचे रंगीत हे
धडधडत्या अनतंत्र हृदयांतुनी
संदेश प्रीतीचा आला असे ।१।

उडवावे भल्यावर शिंतोडे
ही खोड आहे जगाची जुनी
प्याल्याला ह्या मान सद्भाग्य तू
दुष्कीर्त जरि तो झाला असे ।२।

चाल : मूळ गाण्याचीच!  (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  ) भाषांतर करताना वृत्तापेक्षा चालीला महत्त्व दिलेले आहे.

ध्रुवपद - गा-गागागा - गागागा - गागागा
कडवी - लगागा लगागा लगागा लगा

विनंती :


१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. ह्यावेळेला कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.

३. प्रशासक, प्लीज, बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )