प्रेम जडे - निश्चयहि घडे

नायक : प्रेम जडे - निश्चयहि घडे - मग प्रीतिस का मन घाबरते?
नायिका : मन म्हणते - "अवघड रस्ते - नेतील कुठे ते ना कळते." ।ध्रु।
नायक : म्हण तू "अपुल्या प्रीतिचे - गीत न हे बदलेल कधी"
नायिका : तूही म्हण, "वाटेतली - सोबत ही न सरेल कधी"
नायक : प्रीती विरली, साथ न उरली,
दोघे :                              तर चंद्र न उगवेल कधी ।१।
नायिका : म्हणतिल रात्रीला दिशा - "ह्यांच्या गोष्टी सांग ना"
नायक : गीते अपुल्या प्रीतिची- गातिल युवक पुन्हा पुन्हा
नायिका : ना राहिन मी, नसशिल तूही, उरतिल परि खाणाखुणा ।२।

चाल : मूळ गाण्याचीच!  (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

ध्रुवपद : गाललगागा गाललगागा गाललगागा गाललगा

कडवे : गाललगागा गाललगा - गाललगागा गाललगा (ओळ १ आणि २ ... तिसरी ओळ ध्रुवपदाप्रमाणे)

(भाषांतर करताना चालीत बसेल इतपत केलेले आहे.)

विनंती :


१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.

३. प्रशासक, प्लीज, बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )