विचार माझ्या लग्नाचा बहुधा मनात आला

नायिका : विचार माझ्या लग्नाचा बहुधा मनात आला
म्हणूनच तुला आईने बोलावले चहाला
नायक : जाळे हे रचलेय एकला पक्षी बघुन मला
म्हणूनच तुझ्या आईने बोलावले चहाला
 ।ध्रु।

नायिका : संध्याकाळी थेट घरी तू ये चार वाजता
आल्यावरती घाल मागणी मज तू न लाजता
नायक : मजसोबतच्या सप्तपदीचे स्वप्न तुला दिसते
नकळे का भर उन्हात हे चांदणे तुला दिसते
नको रे बुवा असला - हा चहा नको मजला
अरे बापरे आता - क्षमा असो मजला
नायिका : ह्याच स्वभावावरती माझा जीव असे जडला
म्हणूनच तुला आईने बोलावले चहाला ।१।

नायिका : छळू नको रे प्रिया न कर रे चेष्टा तू माझी
हो म्हण चल तू घरी अता बघ शपथ तुला माझी
नायक : मान्य मला हे प्राणप्रिये की मी तुजवर मरतो
ठीक वाटते प्रेम परी लग्नाला घाबरतो
लग्नाआधी सगळे - हे छान छान वाटे
लग्नानंतर येते पाणी डोळ्यावाटे
नायिका : ह्याच स्वभावावरती माझा जीव असे जडला
म्हणूनच तुला आईने बोलावले चहाला ।२।

चाल : मूळ गाण्याचीच!  (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

लांब ओळी : गागागागा गागागागा गागागागा गा
आखूड ओळी : गागागागा गागा - गागागागा गा (कडव्यातल्या नायकाच्या शेवटच्या दोन ओळी)

विनंती :


१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.

३. प्रशासक, प्लीज, बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )