मराठीने आता स्वतंत्र व्हावे

भाषांचे उष्टे खरकटे

देवनागरीच्या एकमेव ताटी

जेवतात संस्कृत, हिंदी व मराठी

परंपरेने शिकलो उष्टे खाणे

लाजिरवाणे मानहानीचे जीणे

आपल्याच चवीचे निवडुन खावे

नको असलेले म्हणे टाकुन द्यावे!

पिढ्यानपिढ्या का चालावे असे

मराठीला स्वतःचे स्वातंत्र्य नसे

मराठी चवीचे अपुल्यास ठावे

तेवढेच मोजके वाढून घ्यावे

पानात पसारा उगाचच कशाला?

पोटभर जेवावे, टाका कशाला?

आपल्या ताटात काय वाढावे

प्रत्येक भाषेने स्वतः ठरवावे

रोमन लिपीच्या एकूलत्या ताटी

यूरोप भाषा का एकत्र नांदती?

मराठीने आता स्वतंत्र व्हावे,

मराठीने आता स्वतंत्र व्हावे

होय मराठीने स्वतंत्र व्हावे

मराठीने आता मराठी व्हावे!

शुभानन गांगल

१९-२०, आयडियल अपार्टमेंटस, गुलमोहर रोड, जुहू, मुंबई ४०००४९

फोन ९१-२२-२६२०१४७२ मोबाईल ९८३३१०२७२७

ईमेल दुवा क्र. १