ओहो रे, ताल भेटतो नदीसी

ओहो रे, ताल भेटतो नदीसी

ओ हा, खैर रे, खैर रे, खैर रे
ओहो रे ताल भेटतो नदीसी |  नदी भेटे सागरासी ||
सागर भेटतो कुणासी? |  कुणी जाणे ना || धृ || 

ओहो रे ताल भेटतो नदीसी |
सूर्यास्तव धरती वेडी | धरतीस्तव चंद्रमा ||
पाण्यातील शिंपेपरी | तहानेला आत्मा ||  ओ मित्रा रे...
पाण्यातील शिंपेपरी | तहानेला आत्मा ||
थेंब मेघी लपले कुठल्या | कुणी जाणे ना || १ ||

अनोळखी ओठांवर का | गीत ओळखीचे ||
अनोळखी इथवर होते | जीवश्च आज जे ||  ओ मित्रा रे...
अनोळखी इथवर होते | जीवश्च आज जे ||
होईल काय क्षणात कुठल्या | कुणी जाणे ना || २ ||

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६११२५

कुठल्या क्षणी काय होईल यचा भरवसा नसल्याचे, शाश्वत सत्य सांगणारे, हे मूळ हिंदी गीत कोणते?