महाभारत- नेत्रदीपक वास्तविकता! ( एक वैज्ञानिक दृष्टिकोन ) -भाग २( पुरावे आणि खंडन)


सर्वप्रथम, माझा लेख वाचल्याबद्दल आणि आपले विचार मुक्तपणे प्रकट केल्याबद्दल धन्यवाद!!!!!!

काही वाचकांना पुरावे हवे आहेत. खास तयांसाठी, (आणि निश्चितच सर्वांसाठी) पुरावे सादर करत आहे........

प्रथम महाभारत हा इतिहासच आहे आणि केवळ महाकाव्य नाही याला पुरावा देतो.

१. महाभारतामध्ये "इक्ष्वाकू" कुळाच्या जवळपास ५४ (ऍप्रॉक्सीमेटली) आणि कुरुवंशाच्या ४२ पिढिचा उल्लेख आहे.
आजपर्यंत कुठल्या महाकवीने महाकाव्य लिहिण्यासाठी एवढ्या पिढ्यांचा उल्लेख केलाय??????

२. एवढेच नव्हे तर, रामायणामध्ये उल्लेखिलेल्या पिढ्यांचा आणि महाभारतामध्ये उल्लेखिलेल्या पिढ्यांचे वर्णन बऱ्याच अंशी जुळते.
कुठलाही महाकवी दूसरे महाकाव्यामधले पात्र चोरून महाकाव्य लिहिणार नाही.

३. महाभारतामध्ये "भिष्मपर्व १/१४" मध्ये भगवान वेदव्यास ध्रुतराष्ट्रास म्हणतात
" ध्रुतराष्ट्रा कुरुवंश जरी नष्ट होणार असला तरी तो जिवंत राहण्याची मी तजवीज करतो. मी ह्याचा इतिहास लिहून ठेवणार आहे"
इतिहास हा संस्कृत शब्द संधिविग्रह पुढिलप्रमाणे---
इतिहास = इति + आ + आस
इति - एकदा
आ - असे
आस( अस्-अस्) - घडले.

४. कुठल्याही महाकाव्यामध्ये तारे, ग्रह, नक्षत्र यांचा अचुक उल्लेख भरपुरदा असत नाहि. तो महाभारतामध्ये आहे.

५. युद्धामध्ये वापरण्यात आलेल्या शस्त्रांचा उल्लेख बघून माणुस थक्क होतो. ते महाकाव्यात असणे शक्यच नाहि.


मला आजपर्यंत बऱ्याच जाणकारांनी महाभारतकाळामध्ये "वायरलेस विडेओ कॉंफरंस" असल्याचे सांगितले आणि ह्याला पुरावा म्हणजे व्यासाने संजयला दिलेली दिव्य द्रुष्टि असे त्यांचे मत आहे ज्यामुळे तो युद्धाचे बिनचुक वर्णन ध्रुतराष्ट्राला सांगू शकत असे.
पण,......
महाभारतामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे कि "सायंकाळी संजय रथाने (युद्धभुमीवरून ) परत आला त्याचे वस्त्र धुळिने माखले होते. "
याचाच अर्थ असा की, संजयला वायुवेगाने पळणाऱ्या अश्वांचा रथ देण्यात आला होता ज्यामुळे तो दिवसा युद्धभुमीवरच संहार बघत असे.


श्री कृष्णाच्या आयुष्यामध्ये राधा नावाची कुठलीही मुलगी नव्हती.   राधा ही केवळ एक कवी कल्पना आहे.

पुरावाः

भगवान श्री क्रुष्णाच्या संपुर्ण आयुष्याचा आढावा घेण्यासाठी पुढिल संदर्भ ग्रंथ प्रमुख आहेत....
महाभारत
भागवत्पुराण
श्री हरिवंशकथासागर

यापैकी, पुराणाला इतिहास म्हणून महत्त्व नाहि. तरी देखिल त्याचासुद्धा विचार करु.

वरिल पैकी एकाही ग्रंथामध्ये, राधेविषयी एकसुद्धा श्लोक नाही. हे आश्चर्यच नाही का??????

भगवान श्री क्रुष्ण!! त्याचे पहिले प्रेम !!! आणि १००००० श्लोकसंख्येचा महाभारत ह्या प्रेमाला एक श्लोक सुद्धा अर्पणा करू शकत नाहि??????
बरे महाभारत विसरले असेल राधेला पण भागवतपुराण???  आणि हरिवंशकथासागरसुद्धा?????

राधेचा उल्लेख मुळात जयदेवाच्या "गितगोविंद" मध्ये आढळतो. पण त्याचा काळ १२व्या शतकात आहे. आणि ते काव्य आहे इतिहास नव्हे.

विष्णुपुराणामध्ये "रधित्" या शब्दाचा उल्लेख आहे पण निश्चित राधेच्या प्रेमामध्ये पाने वाया घालवली नाहित.


यापुढे देखिल प्रत्येक मुद्य्याला मी पुढल्या भागामध्ये पुरावा देतोच आहे.

बरे का!!! मला महाभारताचा उगम मध्य पूर्वेत हे पुस्तक सुचवल्याबद्दल आभार! मी ते नक्कीच वाचेन. आणि काही पुस्तके कोणी सुचवु शकत असल्यास फारच छान!
"ओरकुट" या वेबसाइट वर मी बरेच विस्तृत विवेचन महाभारताविषयी केले आहे. रुग्वेदाचा काळ इसवी सन पुर्व २३७०० आहे हे सुद्धा दाखवले आहे. (याचे सर्व श्रेय डॉ. प. वि. वर्तकांनाच आहे)
कोणाला हवी असल्यास मी त्याची लिंक पुढल्या भागामध्ये प्रकाशित करतो.

आपला प्रतिसाद महत्त्वाचा.......