महाभारत- नेत्रदीपक वास्तविकता! ( एक वैज्ञानिक दृष्टिकोन ) -भाग ३( पुरावे आणि खंडन)

काही वाचकांच्या मते,....

वरील विधानांबाबत एवढेच म्हणू शकतो की केवळ उल्लेख असणे वेगळे आणि त्या त्या गोष्टींचे इत्थंभूत वर्णन असणे किंवा त्या त्या तंत्रज्ञानाची पूर्ण माहिती असणे वेगळे.
माणसाजवळ कल्पनाशक्ती नावाची एक जबरदस्त शक्ती आहे. ह्याच शक्तीच्या जोरावर 'बॅक टु द फ्यूचर'सारखे चित्रपट निघतात. अजून काही हजार (किंवा लाख) वर्षांनी जर आपल्या पुढील पिढ्यांतील कोणाला अशा चित्रपटांच्या सीड्या/कॅसेटी मिळाल्या तर त्यातून तेदेखील 'इसवी सनाच्या विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील आपल्या पूर्वजांकडे टाइममशीन होते. ' असा निष्कर्ष काढू शकतील. पण तो निष्कर्ष केवळ हास्यास्पद असेल.


इलेक्ट्रोप्लेटिंग, टेस्ट ट्यूब बेबी, केमिकल सेल किंवा यांसारखे इतर कोणतेही तंत्रज्ञान त्याकाळी अस्तित्वात होते हे सिद्ध करण्यास पौराणिक कथांमध्ये केवळ त्यांचा उल्लेख असणे पुरेसे नाही. गांधारीचा गर्भ द्रोणात ठेवून (? ) तुपात वाढवला गेल्याचा उल्लेख त्याकाळी आपल्या पूर्वजांना 'टेस्ट ट्यूब बेबी'चे तंत्रज्ञान अवगत होते हे सिद्ध करण्यास पुरेसे नाही.


ही विचारसरणी मला आवडली. पण त्याला देखिल पुरावा देतो....

इलेक्ट्रोप्लेटिंग चा शोध अगस्ती ऋषींनी लावला असा अंदाज आहे. श्री ग. वि. केतकर यांच्या मते अगस्ती ऋषींच्या श्लोकाचा अर्थ पुढिलप्रमाणे--

यवाक्षरमये धातौ सुशुक्त जलसंनिधौ ।
आलेपयति तत्ताम्रम् स्वर्णेन रजतेन वा ॥
सुवर्णलिप्तम् ताम्रम् च शातकुंभमेति स्मृतम् ॥

सोने चांदी यांचा नायट्रेट ऍसिडिक पाण्यात घालावा.  त्यामुळे सोने किंवा चांदिचा लेप तांब्यावर चढतो.  त्याला "शातकुंभ" म्हणतात.

यानंतर "डॅनिअल सेल आणि इलेक्ट्रिसिटी विषयी"

अगस्ती ऋषींचा श्लोक....

संस्थाप्य मृण्मये पात्रे ताम्रपत्रम् सुसंस्कृतम् ।
छादयेत शिखिग्नीवेनार्दाभिः काष्ठपांसुभिः ॥
दस्तालोष्ठो निघातव्यः पारदाच्छादितस्ततः ।
संयोगात जायते तेजो मित्रावरुण संज्ञितम् ॥
अनेन जलभंगोस्ति प्राणोदानेषु वायुषु।
एवम् शतानाम् कुंभानाम् संयोगः कार्यकृत्स्मृतः ॥

मातिच्या भांड्यात स्वच्छ तांब्याचा पत्रा त्यावर मोरचुद त्यावर ओल्या लाकडाचा भुसा त्यावर लीड(जस्त) चा तुकडा पाऱ्याने मढवून ठेवावा. त्यामुळे "मित्रावरुण" नावाचे तेज तयार होते. अशी १०० भांडी एकत्र करावी लागतात. या तेजाने 'जलभंग' होउन प्राणवायू आणि उदान(हायड्रोजन) वायू तयार होतो.


आजच्या जगात ज्या पद्धतीने तंत्रज्ञान प्रतिपादित केल्या जाते, त्याच पद्धतिने ते त्यावेळी प्रतिपादिले जात नव्हते. त्यावेळी पद्धत वेगळी होती. त्यावेळी कदाचित "पुरावे" दिल्या जात नव्हते. फक्त "निष्कर्श" सांगण्याची पद्धत होती. त्यामुळे केवळ खुप सारे सविस्तर वर्णन नाहीम्हणून त्यात तथ्य नाहि असे म्हणने बरोबर नव्हे.
शिवाय,  कित्येक विद्यापिठे जाळल्या गेल्याचा उल्लेख आहे.  नालंदा,  तक्षशिला सारखे विद्यापीठ उध्वस्त झाले होते. त्यामध्येही बरेच जपून
ठेवलेले तंत्रज्ञान नष्ट झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाहि.
म्हणण्याचा उद्देश हा कि, पाश्चात्यांच्या क्रुपेवर डोळा लावून बसण्यापेक्षा आपल्या महाभारतकालीन संस्कृतिला "डोळस" वृत्तिने अभ्यासले तरिही आपले भले होउ शकते. असो.....

आणखी काही प्रतिसाद असे आहेत...


मूळ व्यासांनी लिहिलेल्या महाभारतातील श्लोक किती? सौतीने त्यात भर किती घातली? वैशंपायनांनी जोडलेले श्लोक किती? मूळ महाभारतात कोणकोणत्या नव्या गोष्टी वाढत जाऊन महाभारताचे मूळ श्लोक फुगत गेले? प्राचीन भारतातील जनपदे आणि महाजनपदे यांनी आपापल्या वंशाचे नाव उज्वल व्हावे म्हणून त्यांचा उल्लेख महाभारतात यावा अशी तजवीज केली का? काव्य आणि इतिहास हे एकमेकांपासून कसे वेगळे काढावेत?

कोणत्याही महाकाव्यात ग्रह तार्‍यांचा उल्लेख नाही म्हणताना आपण जगभरातील किती महाकाव्ये तपासलीत?

महाकाव्यात शस्त्रास्त्रांचा उल्लेख येणे का शक्य नाही हे तर अजिबात कळले नाही.  तेव्हा यासर्वांवरही प्रकाश टाकून आम्हाला उपकृत करावे.

ऋग्वेदाचा काळ सुमारे २५००० वर्षांपूर्वीचा  आणि श्रेय वर्तकांना!! शक्य आहे, ते सूक्ष्मरुपाने २५००० वर्षांपूर्वी भ्रमण करून आले असावेत.

सर्वप्रथम, हा प्रतिसाद देण्याऱ्याला मनः पुर्वक धन्यवाद!!!!

हे मीदेखिल वाचले आहे कि....

भगवान वेद व्यासांनी "जय" नावाचा ७००० श्लोकांचा ग्रंथ लिहिला.
वैंश्यपायनाने त्याला २४००० पर्यंत वाढवला "भारत" आणि
सौतिने त्याला १००००० मध्ये परिवर्तित केले. ""महाभारत"

पण याला सबळ पुरावा काय?

उलट, वेगवेगळ्या श्लोकसंख्येच्या वेगवेगळ्या प्रती आढळल्या नाहित.
आणि मजेची गोष्ट म्हणजे सौती स्वतःच महाभारतामध्ये (आदिपर्व अ. १- १०१ ते १०३)लिहितात....
"ऋषींनो मी जे भारत तुम्हास सांगत आहे ते मुळचे १ लक्ष श्लोकांचे आहे. त्यापैकी भारतसंहिता २४००० श्लोकांची असून बाकी ७६००० आहे.  मुळ कथानक २४००० श्लोकाएवढे अवाढव्य असल्याने शिकणे व लक्षात ठेवणे कठिण आहे.
म्हणून स्वतः व्यासांनीच ते १५० श्लोकांमध्ये संकोचित केले व अनुक्रमणिका लिहिली.

येथे कोठेही, वैश्यपायनाने २४००० श्लोकांचा "भारत" लिहिले असा उल्लेख नाहि. वर जो भारत शब्द आला आहे तो "भरतस्य इति भारत"  या अन्वये आहे. 

पुढे आदिपर्व अ. १ मध्येच १०७ व १०८, १०९ मध्ये सौती म्हणतो.....

".... १ लाख श्लोक मनुष्यलोकी प्रसिद्ध झाले आणि मनुष्यलोकी वैश्यपायनांनी सांगितले. तेच १ लाख मी सांगतो, आपण ऐकावे"

सौति आदिपर्व अ. १ (९-११).....

"राजा जन्मेजयाच्या सर्पसत्रात श्री व्यासांच्या उपस्थितित वैश्यपायन या त्यांच्या शिष्याने हे व्यासप्रणीत महाभारत सांगितले ते मी ऐकले व तेच मी तुम्हास कथन करत आहे"

या सर्वांवरून हेच दिसते कि, महाभारत हा एकट्या व्यासानेच रचला आहे. त्यात "भरत वंशाचा" इतिहास २४००० श्लोकांमध्ये आहे आणि ७६००० श्लोकांमध्ये तत्त्वज्ञान, विज्ञान वगैरे आहेत. ते "भारतीय" लोकांच्या नव्हे "मानसिकतेच्या" पचनी पडले नाहि. म्हणून मागे राहिले.

आता आक्षेप दूसरा....

महाकाव्यामध्ये अगदिच ग्रह ताऱ्यांचा उल्लेख नसतो असे मला दुसऱ्या लेखामध्ये म्हणायचे नव्हते. महाकाव्य म्हणजे लेखकाची केवळ काल्पनिक भरारी असा सरळ साधा अर्थ निघतो. पण इतिहास तसा नाही. तेथे कल्पनांची भरारी पेक्षा वास्तविकता जास्त असते. महाभारत काळामध्ये लेखनाची पद्धत पद्यस्वरुपाची होती. आणि आज "रॅशनल सायंस" महाभारताला ऐतिहासिक पुरावे देउन सिद्ध करू शकत नाहि.
म्हणून त्याला केवळ महाकाव्य संबोधण्यात आले असे माझ्या वाचनात आले आहे.  हा महाभारताचा आणि त्या अन्वये आपणा सर्वांचा अवमान नव्हे क?

अगदी होमर चे "इलिअड किंवा ओडिसी" बघा. त्यांना महाकाव्य म्हटले जाते. पण त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. तरिदेखिल महाभारता इत्पत बारिक सारिक नक्षत्राविषयक, ग्रहाविषयक, विज्ञानाविषयक माहिती त्यात नाहि.

महाकाव्यात शस्त्रांचा उल्लेख येणे सहज शक्य आहे. पण जरा महाभारतामध्ये दिलेली वर्णने वाचा. मी केवळ कल्पना दिली होती कारण इतके सगळे ऑफिसमध्ये बसून लिहिने अवघड असते. पण आता मला ते लिहावेच लागणार. तरिदेखिल अगदी "शॉर्ट" मध्ये लिहितो....

महाभारतामध्ये युद्धात किती बाण कोणी मारले. कोठे मारले याचे अगदी कंटाळा येण्याइतपत वर्णन आहे. शिवाय, बरेच अस्त्र रामायणातील जसेच्या तसे आहेत. महाकवी कमीत कमी अस्त्रांची नावे तरी चोरणार नाहि. ते देखिल व्यासांसारखा. हे तर खात्रिपुर्वक.

रुग्वेद काळ  इसवी सन पुर्व २३७०० आहे आणि वरिल विवेचन हे वर्तकांनि सिद्ध केले आहे म्हणून त्यांना श्रेय!! त्याबद्दल लेख वेळ मिळताच लिहितो.

आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.........