वान-वंत आणि मान-मंत

वान-वंत आणि मान-मंत हे प्रत्यय 'युक्त' ह्या अर्थी लागून अनेक शब्द तयार झाले आहेत. उदाहरणार्थ बुद्धिवान, शक्तिमान वगैरे.

काहीवेळा एकाच शब्दाला पुढे वान/वंत वा मान/मंत लागून तयार झालेल्या शब्दांच्या अर्थामध्ये फारसा फरक जाणवत नाही. उदाहरणार्थ शक्तिवान आणि शक्तिमान, बुद्धिवंत आणि बुद्धिमंत, वगैरे.

एकाच शब्दाला पुढे वान वा वंत लागून त्याने होणारे दोन शब्दही काहीवेळा अर्थामध्ये विशेष फरक दाखवत नाहीत. उदाहरणार्थ बुद्धिवान आणि बुद्धिवंत, भगवान आणि भगवंत.

मला पडलेले प्रश्न -

१. वान आणि वंत तसेच मान आणि मंत हे तर-तम दाखविणारे प्रत्यय आहेत का? वानपेक्षा वंत आणि मानपेक्षा मंत हा अधिक श्रेष्ठ असे काही आहे का?

२. वान आणि मान, वंत आणि मंत ह्यांमध्ये कोणता आणि कसा फरक आहे?

३. वान-वंत वा मान-मंत पैकी कोणता प्रत्यय वापरावा ह्यासंबंधी काही नियम आहेत का?

४. वान आणि मान हे प्रत्यय अमुक गोष्टीने युक्त असलेला वा शक्यता दर्शविणारा अशा दोन्ही अर्थी वापरला जातो. उदाहरणार्थ शक्तिमान म्हणजे शक्तीने युक्त असा, तर वर्धमान म्हणजे जो वाढू शकतो असा. बुद्धिवंत म्हणजे बुद्धीने युक्त असा, तर नाशिवंत म्हणजे नाश पावू शकणारा असा. संस्कृत आणि मराठी दोन्हीमध्ये ह्या दोन्ही अर्थी हे प्रत्यय वापरले जातात का? व्याकरणदृष्ट्या हा फरक कसा दाखवता येईल?

५. वत् प्रत्यय संस्कृतातून इतर भारतीय भाषांमध्ये येताना त्याचे वान हे रूप होते आणि त्यामुळे वानयुक्त शब्द हे सहसा संस्कृत नसतात, संस्कृतात वत् चे केवळ वंत होते, वान होत नाही, हे खरे का?