पुण्यातील वाहतुकीचे प्रश्न

पुण्यातील वाहतुकीच्या समस्येबद्दल आपण नेहमी बोलत असतो. त्यात वारंवार येणारा मुद्दा असा, की पुण्यातील वाहन चालकांना शिस्त नाही. त्या बेशिस्तीची अनेक उदाहरणेही आपण अनुभवतो. या चर्चेत त्याबेशीस्तीमागच्या कारणाचा विचार करतो आहे.
या बाबत एक hypothesis असा मांडता येईलः-

अ) पुणे हे सायकलींचे शहर म्हणून एकेकाळी गणले जात होते. प्रत्येक घरी सायकली असत, आणि त्या रोज रस्त्यावरही येत. सायकलींच्या मानाने स्वयंचलित वाहनांची संख्या कमी असे.
आ) सायकलीला वाहतुकीचे नियम लागू नाहीत असा एक सार्वत्रिक (म्हणजे सर्व शहरांमधला) समज (किंवा गैरसमज) आहे.
इ) यथावकाश नागरिकांची क्रयशक्ती वाढली, आणि सायकलींची जाग स्कूटर/मोटरसायकलींनी घेतली. जे पूर्वी सायकली चालवायचे, ते मोटरसायकली चालवू लागले.... पुर्वीएवढेच नियम पाळून. मोटारसयकली चालवणार्यांमध्ये पुर्वाश्रमीच्या सायकलपटुंची बहुसंख्या असे. हळूहळू पिढी बदलली. सायकलचा वारसा नसलेले मोटरसायकलवाले आले.  परंतु तेही सायकलवाल्यांप्रमाणे चालवू लागले. कारण त्यांच्यासमोर चांगली उदाहरणेच नव्हती (role models).
ई) आणखी सम्ऱूद्धी आली. दुचाकीच्या जागी चारचाकी आली. पुन्हा पुर्वाश्रमीच्या दुचाकीवाल्यांची बहुसंख्या आणि त्याच सवयी. यथावकाश आलेले नवे गाडीवालेही तोच कित्ता गिरवू लागले.
सध्या सायकल चालवून मोठे झालेले बहुधा अल्पसंख्य असतील, पण नियम न पाळण्याचा परिपाठ पडून गेला आहे. आणि पूर्वीपेक्षा वाहनांची संख्या खूपच वाढल्यामुळे आता जुन्या सवयींचे तोटे जाणवू लागले आहेत.

जमलीयेका Theory?