नवीन कवी, संगीतकार आशाबाईंना कुचकामी का वाटतात?

नवीन कवी, संगीतकार आशाबाईंना कुचकामी का वाटतात?

परवा कुठ्ल्या तरी चॅनलवर मुलाखत देताना आशा भोसले म्हणाल्या "जुने दिवस, जुनं संगीत, गीतकार-संगीतकार जास्त चांगले होते...आजचे कवी काय लिहतात तर...तु चल मै आ रही हु.."

त्यांच्या या मताला माझा ठाम विरोध आहे. नवं ते सगळं कुचकामी, खराब, टाकाऊ असं सरधोपटपणे कसं म्हणता येईल? जुनं संगीत चांगलं होतच, यात काही वादच नाही, पण म्हणुन नवीन टाकाऊ आहे असं होत नाही...आजचे संगीतकार देखील मेहनती, प्रयोगशील आहेत. नव्या पिढीला भावेल असं संगीत देत आहेत. सोशल नेटवर्किंग, मोबाइल, संगणकावर पोसलेल्या या पिढीला " रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे" अशी गाणी कशी पेलतील? रहमान, शंकर महादेवन, अजय-अतुल, विशाल भारद्वाज, गुलजार, जावेद, स्वानंद किरकिरे यांच्या कामाला ते नवीन पिढीसाठी काम करतात म्हणून कुचकामी ठरवता येइल का? "बिवी हु मै बावर्ची नही, मुजे आता नही खाना बनाना... " अशा प्रकारची गाणी आशाबाईंनी देखील कधी काळी गायली आहेत हे विसरून कसे चालेल..

मला आशाबाईंबद्दल नितांत आदर आहे.. पण त्यांनी नवीन कलाकारांवर केलेली टीका ऐकून वाइट वाटले. नवीन कवी, संगीतकार खरच इतके कुचकामी आहेत का? आपली मते कळवावी...