एका क्षणावरी या आयुष्य तोलुनी मी
चुकता हिशेब केला साऱ्याच जिंदगीचा... १
फकिरी वरी फिदा तू मज ओढ चांदण्याची
कवितेत छंद केला मी चंद्र माळण्याचा... २
नव्हते जरी दिलासे सोडून हात गेले
मी बांधला निवारा छायेमध्ये स्वतःच्या... ३
स्वच्छंद गीत ऐके लाजून शांतता ऐसी
अंतरी ध्यास तिच्या का असा व्यक्त होण्याचा... ४
एकांत कधीचा जागा तृप्तीने रात जरी निजली
बहाणा अवेळी मग झाला फिरूनी उजाडण्याचा... ५
साजण घेऊन आला चांदणे देह सजवाया
उधळून कस्तुरी तूही कर सौदा आकाशाचा... ६
शीतल सहवासाला कलाहाचे गोंदण कैसे
स्पर्शाने करूया उत्सव अंतरीच्या अद्वैताचा... ७
संजय