मोहनाऽऽ मोहना

हे स्मितविलसित उज्ज्वलवदना
श्यामल कुंतल
कांचनवर्णा
उपमा न तुझ्याऽऽ
यौवना...
मोहनाऽऽ
मोहना... ।ध्रु।


 प्रथम तुझ्या नयनांनी लुटसी लांबून तू
छळ मग पहासी तो भूषण मानून तू
वेड्या तुज ना
हे येत मना
उन्मन किति करत हे मना ।१।
हे स्मितविलसित  ...


धनभर दे यातना नि धनभर आघात कर
मान्य सर्व आहे तू किंचितशी प्रीत कर
मन तुजपाशी
त्रास मनासी
त्रास तू न अधिक दे मना ।२।
हे स्मितविलसित  ...

३. पर्याय : तेजसवदना किंवा तेजोवदना
४. पर्याय :
मूळ वृत्ताप्रमाणे :
उपमा तुझिया यौवना ना...  किंवा... उपमाच तुझ्या यौवना ना
शब्दशः : तुजसम यौवन
ना पुन्हाऽऽ
शब्दशः आणि मूळ वृत्ताप्रमाणे : तुजसम यौवन न पुन्हा न पुन्हा
५.
शब्दशः : मनरमणाऽऽ मनरमणा... (श्रेय मिलिंद फणसे)

१. पर्याय : तोऱ्याने बघसी मग तो छळ ताणून तू
२. धनभर = मनसोक्त (येथे पाहा )

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...   ना किंवा णा  असे जमवा बरका!  यमकाची जागा ठळक केलेली आहे.