कुत्रा पाळणे आहे

मला एक कुत्रा पाळायचा आहे. मी पुण्यात फ्लॅट मध्ये राहतो. त्या अनुषंगाने पूर्ण वाढ झाल्यानंतर मध्यम आकाराचा होईल असा कुत्रा मला पाळायचा आहे. मला पडलेले काही प्रश्नः

१. कसल्या जातीचा कुत्रा पाळता येईल. (शक्यतो पांढरा / तपकिरी रंगाचा हवा आहे)
२. कुत्र्याच्या जातीप्रमाणे लसीकरण व तसेच इतर औषधे बदलतात काय?
३. साधारणपणे त्यांची काय काळजी घ्यावी लागते?
४. आम्ही पुर्ण शाकाहरी आहोत. त्यामुळे कुत्रा पण शाकाहारीच राहिल.  
५. पुण्यामध्ये पाळीव प्राणी मिळण्याचे खात्रीचे दुकान कोणते आहे?

ह्याशिवाय जितकी जास्त माहिती देऊ शकाल तेवढी द्या. मी कुत्रा पाळण्याबाबतीत गंभीर आहे.

मी पूर्वी गावाकडे असताना एक गावठी जातीचा कुत्रा पाळला होता. त्यामुळे थोडा अनुभव आहे. माझ्या बायकोच्या माहेरी कुत्रा (गावठीच!), मांजर गुण्यागोविंदाने रहायचे. त्यामुळे तीलादेखिल चांगला अनुभव आहे. मुख्य म्हण्जे माझ्या ५ वर्षाच्या मुलीला प्राणी खुप आवडतात.

(ता. क. : कुत्र्याचा 'कुत्रा' असा उल्लेख केल्याने कुणा प्राणिमित्राच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्वः  )