क्षणभर विश्रांती

आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, प्रत्येक माणूस हा घड्याळाच्या काट्यांमागे धावत असतो. सकाळी लवकर उठा, लोकल पकडा... ऑफिसला जा... तिथे कामाचा ताण, स्पर्धेमुळे कामे पटापट आवरणे जरुरीचे असते. सुट्टीच्या दिवशी इतर घरची कामे असतात...


या सगळ्यामधुन आपण दमुन जातो आणि कधीतरी ठरवतो की आता एखादा दिवस विश्रांती घ्यावी... प्रत्येकाची विश्रांती घेण्याची पद्धत वेगवेगळी असते. योग्य पद्धतीने विश्रांती घेतल्यास आपण थोड्याच वेळात ताजेतवाने होऊ शकतो...


तर प्रत्येकाची विश्रांती घेण्याची पद्धत काय आहे? आणि ती तशी का आहे हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे...


कदाचित जाणकार लोक काही सुचवूही शकतील...