भाषिक विनोद

महाराष्टाच्या विविध भागात फार विविध प्रकारे मराठी भाषा बोलली जाते.
आपण ज्या भागातले आहोत त्यानुसार आपण खूप शब्द आणी वाक्ये सहज बोलून जातो
आणी त्यातूनच विनोद निर्मिती होते. अश्या या बहुरंगी आणी बहुढंगी मराठी
भाषेस.



सांगली, कोल्हापूर कडचे लोक 'दिवा बंद कर' असे न म्हणता, 'दिवा काढ',
'बल्ब काढ' असे म्हणतात. कॉलेज ला असताना असे म्हणले की लगेच आमचे मित्र
बल्ब सॉकेट मधून काढत आणी म्हणत - हा घे काढला बल्ब.



अमरावती, नागपूर - विदर्भ च्या लोकांना सगळी वाक्ये 'करून राहिलो' ने
संपवायची सवय असते. ते नेहमी 'मी हे करून राहिलो', 'मी ते करून राहिलो' असे
म्हणतात. आमचा ऐक अमरावतीकर दोस्त रिझल्ट लागल्यावर म्हणाला - चला बरे झाले
विषय सुटून राहिला.आता आम्ही काय बरे समजावे? विषय राहिला का सुटला?



अश्याच भाषिक विनोदासाठी ही उठाठेव...