'मी' ओळी!

आपल्या कवी/कवयित्रींनी स्वतःबद्दल लिहिलेल्या ओळींचा संग्रह करण्याचा हा प्रयत्न.


सर्वप्रथम मला माहीत असलेल्या ओळी देतोः


ग्रेसः


 मी महाकवी दुःखाचा, प्राचीन नदीपरि खोल,


दगडाचे माझ्या हाती, वेगाने होतसे फूल.


गदिमाः


ज्ञानियाचा वा तुक्याचा, तोच माझा वंश आहे;


माझिया रक्तात थोडा, ईश्वराचा अंश आहे!


कुसुमाग्रजः


विहरलो वाऱ्यापरी मी कधीचा, तरी मी मुळी अनिरुद्ध नाही ।


लाभला मज कुणाचा संग नाही, तरी मी मुळी निस्संग नाही ।।


रचनेस माझ्या कोणताही बंध नाही, तरी तीही अनिर्बंध नाही ।


मी न गहिरे रंग भरले तरीही, चित्र माझे एकही बेरंग नाही ॥


 


(आणि स्वतःच्या कवितेबद्दल -


समिधाच सख्या या, यांत कुठे ओलावा,


कोठुनी फुलापरी वा, मकरंद मिळावा;


जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,


तव आंतर अग्नी, क्षणभर तरी फुलवावा.)


तर मग येऊ द्यात तुम्हाला माहीत असलेल्या 'अशा' काव्यपंक्ती!