असं किती काळ म्हणत राहणार?

या वर्षी गणपति उत्सवांत एक गोष्ट निदर्शनास आली. पूजा व आरती झाल्यावर जमलेले लोक व स्वतः यजमान "आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन.." अशी प्रार्थना म्हणतात. नव्याने गणपतिपूजन करणाऱ्यांनी असे म्हणावे हे समजण्यासारखे आहे. पण वर्षानुवर्षे इतकेच काय पण पिढ्यान पिढ्या गणपतिपूजन करणारेही (प्रार्थनेत) आपल्याला आवाहन पूजन माहीत नाही असे म्हणत असतात तेव्हा आश्चर्य वाटते. इतकी वर्षे पूजन करूनही ही माणसे आवाहन पूजन कसे करावे हे शिकली नसतील तर त्यांनी ती वर्षे फुकट घालविली असेच म्हंटले पाहिजे. गणपति ही प्रार्थना ऐकत असेल तर त्याला अशा न शिकणाऱ्या भक्तांची दया न येता रागच येत असेल. की ही प्रार्थना केवळ उपचार म्हणून म्हंटली जाते? तसे असेल तर ती म्हंटली नाही तरी काही बिघडत नाही.


तुम्हाला काय वाटते?