भारतीयांची मानसिकता

सर्व मनोगतींना विनम्र अभिवादन,


मी अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून जर्मनीमध्ये शिकत आहे. हा विषय तसा आपणा सर्वांना ओळखीचा आहे, तरीही गेल्या २ वर्षात माझ्या निरीक्षणानुसार मला भारतीयांच्या आणी इतर देशातील लोकांच्या मानसिकतेत जो फरक जाणवला त्याबाबतीत अजून काही मते जाणून घ्यायला आवडतील. उदाहरणार्थ, सर्वसाधारणपणे भारतीयांची देहबोली ही एक प्रकारचा मानसिक न्यूनगंड असल्याचे दर्शवते(खांदे पाडून चालणे, बोलताना आवाजपातळी खालची असणे इ.), तर इतर देशातील लोकांच्या वागण्या-बोलण्यात एक प्रकारचा सहजपणा व आत्मविश्वास जाणवतो. ह्याला अपवाद आहेत हे मी नाकारत नाही.  खेळांमध्येही दिसून येते की आपले खेळाडू आक्रमकतेत कमी पडतात(क्रिकेट ह्या खेळात तर हे सिद्ध झाले आहे की आपले खेळाडू जास्त मानसिक ताण सहन करू शकत नाहीत). आश्चर्याची(आणी खेदाची) गोष्ट ही आहे की बुद्धिमत्तेत आणी कर्तृत्वात इतरांशी तोडीस तोड(बहुतेक वेळा वरचढ असूनही भारतीयांची मानसिकता अशी का?


वरील विधानात काही प्रमाणात अतिशयोक्तीही असेल, त्याबद्दल क्षमस्व.