केर काढता-काढता थांबून निताताईनी निमूला विचारलं,' काय वो ताई, मग तिकडं अमेरिकेत समदी इंग्रजीमधीच बोलत्यात व्हय'?निमू हसून म्हणाली, 'हो, सगळे इंग्रजीमध्येच बोलतात'. 'पन मग तुम्हाला पन तसंच बोलाव लागल?' निमू, 'हो'. :-) निमू अमेरिकेला जाणार हे कळलं आणि त्यांच्या छोट्याशा गावातील जुन्याशा घरात धावपळ चालू झाली होती. तशी दर थोड्या वर्षात होतच होती. जेव्हा पहिल्यांदा तिने उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी राहायचा हट्ट केला, जेव्हा पहिल्यांदा त्या घरातील कुणी मुलगी नोकरीला गेली आणि मुलगी १८ वर्षाची झाली की तिचे लग्न झालेच पाहिजे हा नियमही पहिल्यांदा तिने तोडला. प्रत्येकवेळी घरात छोटी-मोठी वादळं व्हायची पण एकुलती एक असल्याने आणि तेही तिचे आजपर्यंत प्रत्येक निर्णय यशस्वी ठरल्याने ही वादळं मंदावली होती. रागाचे कौतुकात रुपांतर झाले होते. पाटलांचं घराणं तसं सुशिक्षित होतं पण जुन्या वळणाचं. निमूची आई पण अगदी १२वी पास झाली होती.असो. तर पुढच्या आठवड्यात अमेरिकेला जायचे नक्की झाल्याने निमू ४ दिवसांसाठी घरी आली होती. आईने प्रेमाने रव्याचे लाडू, पापड,ओला मसाला यांचे डबे भरून दिले. 'अगं आई, तिकडे सगळं मिळतं'. 'असू दे गं, चार दिवस तरी घरचं खाशील. मग हायेच की आपला हात जगन्नाथ!.'
नाही-नाही म्हणता एकाच्या दोन ब्यगा झाल्या आणि सुट्टीचे ४ दिवस भुर्रकन उडून गेले. पाटील आपल्या पोरीला सोडायला मुंबैला पण जाऊन आले. आयुष्यात पहिल्यांदाच विमानतळ पण पाहून घेतलं. निमूला जाऊन एक दिवस झाला नाही तोवरच तिचा अजून फोन आला नाही म्हणून आजोबांना चुटपूट लागलेली. लवकरच तिचा फोन आला आणि सगळ्या घराला हुश्श झालं. निमू व्यवस्थित पोहोचली होती. तिचा आता नियमितपणे शनिवारी फोन येऊ लागला. पाटलांची मान एकदम ताठ झाली होती गावात. लवकरच पाटलीण बाईंनीही निताताईला अमेरिकेच्या गमती-जमती सांगायला सुरुबात केली. निमूच्या फोनची वाट पाहणं, तिची खुशाली विचारणं, कुठं फिरून आली की कसं वाटलं याची चौकशी करणं हा त्यांच्या एक कार्यक्रमच झाला होता.तशी निमू कॉलेजापासूनच बाहेर राहायला लागल्यामुळे पहिले एक-दोन महीने निवांतपणे गेले. लवकरच गणपतीचे दिवस जवळ येऊ लागले. सणवाराला निमू घरी असायचीच. पाटलीण बाईंना जरा अस्वस्थ होऊ लागलं. तिकडे निमूला अमेरिकेत पोचल्यावर २-३ दिवसातच घर मिळालं. एक रूममेट पण. मग तिथल्या राहणीमानाशी जुळवा-जुळव सुरू झाली. घरातल्या भाजीपाला आणण्यापासून जेवून भांडी घासेपर्य़ंत सगळं स्वतः:च करायचं. :-( शिवाय ऑफिसातील काम सांभाळायचं. आठवड्याची लोंड्री स्वतः:च करायची. कामाची तिला सवय होती पण प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट पाहिली की तिला घरी सांगावंस वाटायचं. घरातला डिशवॉशर पाहून तिला निताताईची आठवण झाली.इथे भांडी पण मशीनमध्ये घासली जातात सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे आर्श्चयाचे भाव कसे असतील याचा विचार करूनच तिला हसू आले. :-) फोन करण्यासाठी ती मग शनिवारची वाट पाहू लागली. आठ्वड्य़ाच्या सर्व गोष्टी तिला एकाच दिवसात, एकाच तासात सांगायच्या असत.एक-दोन महिने ठीकठाक गेले. सगळं मार्गी लागल्यावर मात्र घराची जास्त आठवण होऊ लागली.

अमेरिकेत आल्यावर कंपनीकडून मिळालेला संगणक, इंटरनेट या सगळ्या सुविधांचा वापर नियमित झाला होता.लवकरच तिला 'च्यटींग', वेबक्यम या सगळ्या गोष्टी पाहून निमूला वाटले आपणही घरी इंटरनेट घ्यायला सांगितले तर? निमू शिकत असताना तिने एक संगणकही घेतला होता. ती इकडे आल्यापासून तो तसा घरी पडूनच होता. फक्त इंटरनेट कनेक्शन तर घ्यायचे होते. तिने शनिवारच्या आधीच घरी फोन करून आनंदाने आपली कल्पना सांगितली. पण जितक्या उत्साहाने तिने ती सांगितली तेव्हढ्याच लवकर तिची निराशाही झाली. पाटील म्हणाले," अग पोरी, आम्हाला कुठलं हे सगळं जमणार आता. आमची पन्नाशी उलटली आता. तो 'कंप्युटर' वगैरे आम्हाला काय जमत नाही बघ. आपली कोर्टाची काम पण मी त्या कोपऱ्यावरच्या बाळ्याकडून करून घेतो". पाटलीण बाईंची तर वेगळीच कारणे. "आता गौरी-गणपती आले. सगळी तयारी बाकी आहे, सफाई करायची आहे अजून, फराळाची तयारी. कसं जमणार आहे? ".
नेहमीप्रमाणे निमूला पहिला नकार मिळाला होता. तिने आपला हट्ट कायम ठेवत परत समजावले, "अहो बाबा, तुम्हाला मला बघावंस वाटत नाही का? मलाही तुम्हाला बघता येईल. शिवाय माझे घर दाखवता येईल. मी काढलेले फोटॊ तुम्हाला पाहता येतील." निमू त्यांना सर्व प्रकाराचे लालूच दाखवून पाहत होती. दोन आठवडे उलटून गेले आणि निमूने परत तोच विषय काढला. "बाबा, अहो मी सगळी चौकशी केली आहे. आपल्या टेलिफोन खात्यात जाऊन इंटरनेट कनेक्शनचा फॉर्म भरायला लागतो फक्त. बाकी कॉम्प्युटरसाठी आपले ते घोरपडे काका आहेत ना त्यांचा मुलगा आहे ना तिथे. मी त्याला फोन केला होता. तो म्हणाला आहे सगळे व्यवस्थित बसवून देतो म्हणून. मी त्याला बाकी लागणारे जे सामान आहे ते पण आणायला सांगितले आहे. तुम्ही फक्त फॉर्म भरून या". निमूच्या त्या सूचना ऎकून पाटील थक्क झाले होते. त्यांच्याकडे नाही म्हणायला काही कारणच शिल्लक नव्हते. दोन दिवसांत घोरपडे काकांचा मुलगा येऊन घरातला संगणक काढून, त्याच्या सगळ्या वायर बरोबर लावून गेला होता. त्याने कसलासा क्यमेरा पण आणून जोडला होता.
पाटील नाईलाजाने टेलिफोन खात्यात जाऊन फॉर्म भरून आले. आता पाटलांचा गावात काय कमी वट होता का? लवकरच टेलिफोन खात्यातला माणूसही येऊन वायरी जोडून गेला. त्याने कसलेसे खात्याचे नाव आणि परवलीचा शब्द कागदावर लिहून दिला व म्हणाला, 'हा जपून ठेवा बरं का. याचाच वापर करावा लागेल कनेक्शन साठी'. पाटीलीण बाईंनी तो कागद नीट जपून ठेवला.निमूच्या तिकडून सूचना चालूच होत्या. हे आले का,ते केले का? आता आपल्या आई-बाबांना पाहिल्यावरच ती शांत होणार होती. तिने आपल्या बाबांना समजावले." तो क्यामेरा आहे ना, त्यातून तुम्ही, आपलं घर सर्व मला दिसणार आहे. तुमचा आवाज पण ऎकू येईल आणि तुमच्याशी गप्पा पण मारता येतील". पाटील कुटुंबीयं आपल्या मुलीच्या उत्साहापुढे काही बोलूच शकत नव्हते. लवकरच सगळा सेट-अप पूर्ण झाला. निमूने परत एकदा घरी फोन केला. "काय मग आई, उद्या येणार ना इंटरनेटवर? मी तुमच्यासाठी इंटरनेटवर एक खाते उघडले आहे. त्याची माहिती मी उद्याच देईन." निमूच्या आईने काही न बोलता फोन तिच्या बाबांकडे दिला. ते म्हणाले," हे बघ पोरी, तू हे सगळं केलंस खरं. आम्हालाही तुला बघावंस वाटतं. पण आता हे नवीन शिकणं-बिकणं आमच्याकडून नाही होणार बघ."निमू तर एकदम गळूनच गेली. तिने बरं म्हणून फोन ठेवून दिला. पण तिच्या डोक्यातले विचार काही कमी होत नव्हते. का संगणकाबद्दल एव्हढी अनास्था? का नाही नवीन काही शिकायची इच्छा?.

थोड्यावेळाने परत फोन केला तिने घरी. आधी आईशी बोलाव असं ठरवलं.
पाटलीणबाई," बोल बेटा!".
निमू, "आई, तुला आठवत मी लहान असताना तू मला बाराखडी शिकवलीस. भाकरी थापता-थापता जमेल तशी मला गणितं सोडवायला मदत केलीस?"
पा.बा.," हो आठवतं ना".
निमू,"मग एकदा मी अभ्यास केला नाही म्हणून शिक्षा दिलीस व माझ्याबरोबर तूही नाही जेवलीस. तिथूनच तर माझ्या अभ्यासाचा पाया भक्कम झाला. तू जर मला शिकवलं नसतंसं तर मी आज इथे आलेच नसते ना? मग आज तू अभ्यास नाही करायचा म्हणतेस, मी तुला काय शिक्षा देऊ? तूच मला प्रोत्साहन दिलंस ना की मी अजून शिकावं, नोकरी करावी, कधी कधी बाबांशी भांडलीस देखील माझ्यासाठी. मग आता का हा निरुत्साह? का तू स्वतः: ठरवत की मी संगणक शिकेन, मुलीशी बोलेन.मला माहीत आहे तुला माझी आठवण येते. तर आपल्या मुलीला भेटायला, बघायला, तू जराही कष्ट नाही घेणार?".निमूचा प्रत्येक शब्द त्यांना लागत होता आणि प्रत्येक शब्द बरोबरही होता. त्यांनी आपल्या डोळ्यातील पाणी आवरत फोन पाटलांकडे दिला. गंभीरपणे त्यांनी फोन उचलला.
पाटीलसाहेब," काय गं काय बोललीस तू आईला? ती रडत बसलीय तिकडे".
निमू, " काही आठवलं ते सांगितलं तिला. तुम्हालाही काही विचारायचं होतं मला. तुम्हाला माहीतेय मला तुमचा खूप अभिमान वाटतो. काम करत-करत तुम्ही शिक्षण पूर्ण केलंत, तेव्हढंच नाही मलाही खूप शिकू दिलंत. मी १२ वी नंतर हट्ट धरला होता ना की मला इंजिनियरींगलाच जायचं आहे. तेव्हा खरंतर मला फक्त शिकायचं होतं. पण तिथे प्रवेश घ्यायला जाताना मला काहीही माहिती नव्हतं. तुम्हीच तर मला तो फॉर्म कसा भरायचा हे सांगितलं ना?सगळी माहितीपत्रक गोळा केलीत, नंतर अगदी फी भरून, माझ्यासाठी राहायची, जेवायची सोय कशी हे बघूनच तुम्ही परत गेलात घरी. म्हणजे तेव्हाची तुमची निमू तर तुमच्यासाठी छोटीच होती. मग पुढच्या चार वर्षात असं काय शिकलेय मी की मी तुमच्य़ापुढे गेलेय? असं काय आहे जे तुम्हाला शिकता येणार नाहीये? बाबा मला तुमची मुलगी म्हणूनच राहायचं आहे. तुम्ही मला शिकवावं आणि मी शिकावं,मी हट्टाने मागावं आणि तुम्ही पुरवावं, मी आळशी व्हावं आणि तुम्ही मागे लागून काम करवून घ्यावं. तुम्ही लोक आजही माझे आई-बाप आहात आणि मला तसेच हवे आहात जसे मी लहान असताना होतात. मला तुम्हाला पाहायचं आहे, लवकरात लवकर !!! मग आता बोला कधी पूर्ण करताय माझा हट्ट?" पाटलांना एकदम भरून आलं होतं. ते म्हणाले उद्या फोन कर मग बोलू.
निमूनेही भरल्या उराने फोन ठेवला होता. दुसऱ्या दिवशी तिने नेहमीच्या वेळेस फोन केला. तर फोन लागतच नव्हता. बराच वेळ प्रयत्न करून मग तिने शेवटी शेजारच्या काकूंना फोन केला. त्या पण जरा घाईतच होत्या. म्हणाल्या, "बरं झालं फोन लावलास तुझ्याच घरी चालले होते. तुमचा तो कॉम्प्युटर सुरू केलाय म्हणे तुझ्या बाबांनी". ती एकदम उडालीच. पटकन संगणक सुरू केला तर काय???? 'या..........हूहूहूहूहू'......कुणाचे तरी बोलावणे आले होते. आई-बाबांनी स्वतः:चे खाते उघडले होते. :-) तिने मग घाईघाईने स्वतः:चा क्यामेरा, माइक सुरू केला आणि त्यांनाही सुरू करा म्हणून सांगितले. लवकरच तिला घोरपडे काकांच्या मुलाचा आवाज आला आणि ही जादू कशी झाली ते कळले. त्याच्या सूचना ऎकून पाटलांनी क्यामेरा सुरू केला व पुढे पाहून माइक हातात धरून बोलायला सुरुवात केली. निमूला तिचे आई-बाबा दिसले. खुर्चीत बसलेले आणि संगणकाकडे उत्सुकतेने पाहणारे त्यांचे चेहरे पाहून निमूला बाकी सारे धूसर दिसू लागले होते!!!
-अनामिका.