ऊर्जेचे अंतरंग-०६

ऊर्जेचे अंतरंग-०६: प्रारण ऊर्जा

मुळात सृष्टीवरील सर्वच ऊर्जा ही इथली नाही. ती एकतर सृष्टीच्या जन्मासोबत इथे आलेली आहे किंवा सततच्या किरणांकरवी इथवर येत आहे. आलेल्या ऊर्जेची विविध रूपे आपण ह्यापूर्वी पाहिली. आता आपण निरंतर इथवर येत राहणाऱ्या 'प्रारण' ऊर्जेचे दोहन कसे करता येईल? ती सक्षमखर्ची पद्धतीने, पुरवून पुरवून कशी वापरता येईल? न पेक्षा, वाया जात असल्यास, अडवा व जिरवा धोरणाने इथेच खिळवून ठेवून नंतर कशी वापरता येईल हे पाहणार आहोत.

ऊर्जेचे अंतरंग-०५

ऊर्जेचे अंतरंग-०५: आण्विक ऊर्जा

न्यू मेक्सिकोतील अल्बुकर्कच्या दक्षिणेस १२० मैलांवरील अमेरिकेच्या अलामागार्डो भूदलाच्या, बिकिनी बेटावरील हवाई तळावरील एका उंच लोखंडी मनोऱ्यावर, स्थानिक वेळेनुसार, १६ जुलै १९४५ रोजी सकाळी ०५३० वाजता, जगातील पहिला ज्ञात अणुस्फोट करण्यात आला. ज्येष्ठ वैज्ञानिक ओपेनहॅमर ह्यांनी, त्या स्फोटातील ऊर्जेचे वर्णन करताना 'दिवि सूर्यसहस्रस्य*' ह्या गीतेतील श्लोकाचा आधार घेतला. हजार सूर्यांएवढी दीप्ती त्यांना त्या स्फोटात भासली. स्फोटाचा तत्कालीन उद्देश दुसऱ्या महायुद्धाचा अंत लवकरात लवकर घडविणे हा असला तरीही, ह्या घटनेनंतर जगाचा ऊर्जास्त्रोतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलला.

दिवाकरांच्या नाट्यछटा

१९११ ते १९३१ या काळात कै. शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांनी एकूण ५१ नाट्यछटा लिहिल्या.इतक्या वर्षांच्या कालौघात त्या आजही टिकून आहेत. त्यानंतर बाकी बावन्नावी टिकून रहाणारी (बावनकशी) नाट्यछटा कुणी लिहिल्याचे ऐकिवात नाही. दिवाकरांना नाट्यछटा हा प्रकार सुचला तो ब्राऊनिंगच्या 'मोनोलॉग' या काव्यप्रकारावरून. ब्राऊनिंगकडून उसने घेतलेले हे बीज त्यांनी अस्सल मराठी बाजाने फुलवले. It does not matter what you borrow, but what you make of your borrowing हे सिद्ध् व्हावे असे. नाट्यछटा म्हणजे नाटकाची संक्षिप्त आवृती नव्हे, स्वगतासारखे एकांगी संभाषणही नव्हे. नाट्यछटा म्हणजे कमीत कमी शब्दांत एखाद्या प्रासंगिक वर्णनातून अधिक व्यापक सूत्र समोर मांडणारा एक स्वतंत्र साहित्यप्रकार. नाट्यछटेत वापरली जाणारी विरामचिन्हे, बोलीभाषेतले शब्द, तात्कालिन संदर्भ, मधूनमधून घेतले पॉजेस यातून एक मोठे चित्र उभे रहाते.
दिवाकरांनी हा प्रकार आपल्या अभिव्यक्तीसाठी का निवडला असावा? मला समजते त्यानुसार दिवाकर हे अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू आणि कमालीचे संवेदनशील होते. त्या काळातील इतर साहित्यप्रकारांचा विचार केला तर त्यांत त्या वेळी एक साचेबंदपणा, तोचतोचपणा आलेला असावा - अपवाद अर्थात केशवसुतांचा- त्या काळात वर्डस्वर्थ्, शेली, कीट्स् वगैरे कवींच्या वाचनाने दिवाकरांना लिखाणाच्या या नवीन प्रकाराची निर्मिती करण्याची स्फूर्ती मिळाली असावी. त्याआधी त्यांनी शेक्स्पिअरच्या नाटकांवर आधारित काही नाटके लिहिण्याचा प्रयत्नही केला होता. तो मात्र काही सफल झाला नाही. स्वभावाने अबोल आणि भिडस्त असणार्‍या दिवाकरांना आपले अंतरंग, त्यातली सुखदु:खे - म्हणजे सुखे कमी, दु:खेच जास्त - व्यक्त करण्यासाठी नाट्यछटेचा जिवंतपणा आणि त्यातली किंचित सांकेतिकता अधिक भावली असावी.
दिवाकरांच्या नाट्यछटा समजून घ्यायच्या म्हणजे त्या काळातली स्थिती समजून घ्यायला हवी. एका बाजूला परकीय साम्राज्यामुळे समजलेले इंग्रजी लेखकांचे विचार आणि त्यामुळे आपल्या समाजातील न्यूनांची होत असलेली जाणीव असावी. दुसरीकडे जानवी, सोवळी, एकादष्ण्या आणि श्रावण्या यात करकचून बांधलेला समाज असावा. एकीकडे बालविवाह आणि बालविधवा, केशवपन आणि विधवांचे सर्व प्रकारांने शोषण हे राजरोसपणे चाललेले असावे, तर दुसरीकडे बाळंतरोगाने तान्ह्याला जन्म देऊन मरणारी तरुण आई आणि इन्फ्लुएंझा ते प्लेगाने पटापट मरणारी माणसे असावीत, असे हे कोणत्याही संवेदनशील माणसाला कमालीचे अस्वस्थ करणारे विसंवादी सामाजिक वातावरण असावे. या सगळ्यातून दिवाकर तरले ते केवळ वाचनामुळे. या अफाट वाचनातूनच त्यांना लेखनाची स्फूर्ती मिळाली असावी. नाट्यसंवाद हा नाट्यप्रसंगांसारखा प्रकार त्यांनी हाताळल्याचे दिसते. 'कारकून' हे नाटक आणि 'सगळेच आपण ह्यः ह्यः', 'ऐट करू नकोस!' या नाटिका त्यांनी लिहिल्याची माहिती आहे. मेटरलिंकच्या ' द साइटलेस' या नाट्यकृतीचे त्यांनी भाषांतर केल्याचीही माहिती आहे,आज हे सगळे कुठे आहे कोण जाणे!
दिवाकर हे इंग्रजीचे उत्तम शिक्षक होते. शिक्षक म्हटल्यावर त्याचा व्यासंग असलाच पाहिजे अशा जुन्या विचारसरणीचे हे लोक. ऑस्कर वाइल्ड, पुशकिन, पिनिअरो, गॉर्की वगैरे लेखकांचे साहित्यही दिवाकरांनी वाचल्याचे उल्लेख आहेत. रविकिरण मंडळाचेहही ते सदस्य होते. दिवाकरांच्या नाट्यछटा 'उद्यान' मासिकात आणि 'ज्ञानप्रकाशा'त छटेमागे एक रुपया या मानधनाने प्रसिद्ध झाल्या. शेवटी दिवाकरांनी काही भावकथाही लिहिल्या. वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी इन्फ्लुएंझाने दिवाकर मरण पावले.
आता थोडेसे 'तेवढेच ज्ञानप्रकाशात' या नाट्यछटेविषयी. या कथेला संदर्भ आहे तो  रमाबाई रानडे यांच्या मृत्यूचा. पण तोही केवळ संदर्भ म्हणून. या छटेच्या निमित्ताने दिवाकर माणसाच्या दुटप्पी स्वभावावर, दिखाऊपणावर नेमके बोट ठेवतात."चला! मोठी एक कर्तीसवरती बाई गेली!" असे म्हणून रमाबाईंच्या मोठेपणाचे गळे काढणारे हे प्राध्यापकमहोदय त्यांच्या अंत्यदर्शनाला जायचा विषय काढतात, पण त्यातला त्यांचा हेतू वेगळाच आहे. मृतांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या तथाकथित प्रतिष्ठित माणसांची - बव्हंशी प्राध्यापकांची - यादी 'ज्ञानप्रकाशा'त प्रसिद्ध् होत असे. या निमित्ताने का होईना, आपले नाव या वर्तमानपत्रात छापून यावे अशी ती प्रसिद्धीची लालसा आहे. 'पेज थ्री' या सिनेमात सोनी राजदानने आत्महत्या केल्याचा निरोप येतो तेंव्हा डॉली ठाकूर कपड्यांची खरेदी करत असते. आता अंत्यदर्शनाला जावे लागणार, मग तिथे नवे कपडे नकोत का असा तात्काळ थेट रोख विचार करून ती त्या विक्रेत्याला 'शो मी समथिंग इन व्हाईट' असे निर्विकारपणे सांगते - तेच हे माणसात लपलेले गिधाड! "मला तरी कुठे येवढे जावेसे वाटते म्हणा!" यात त्याचा हिडीस चेहरा दिसतो, पण पुढे "कारण आता गेले काय अन् न गेले काय सारखेच!" अशी फिलॉसॉफिकल सारवासारव केल्याने तो अधिकच बेगडी आणि भेसूर दिसू लागतो! 'प्यासा' मध्ये जिवंत असताना ज्या भावाला हिडीसफिडीस केली त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कवितेच्या रॉयल्टीच्या रकमेवर घासाघीस करणारे त्याचे भाऊ याच वैश्विक कुटुंबातले!
अडीचएकशे शब्दांच्या दिवाकरांच्या या नाट्यछटेत हे इतके सगळे लपलेले आहे. संभाषण सुरु आहे असे वाटावे अशी भाषा हे तर नाट्यछटेचे वैशिष्ट्यच असते. "...हो, बरोबर...." अशी सुरुवात, "-केंव्हा? आता मगाशी सहाच्या सुमारास?" असा प्रश्न. "....बाकी बर्‍याच थकल्या होत्या म्हणा!" अशी वाक्ये, यांनी या छटेला एक 'परफॉर्मिंग क्वालिटी आली आहे. असे वाटते, की हा माणूस समोर आहे, बोलतो आहे!
नुसत्या संवादांतून स्वभाव आणि प्रसंग रेखाटन हे चांगल्या नाट्यछटेचे गमक आहे. दिवाकरांना ते इथे उत्तम रीत्या साधले आहे 'तेवढेच 'ज्ञानप्रकाशा' त!' मला दिवाकरांच्या सर्वोत्तम छटांपैकी एक वाटते ती त्यामुळेच.

कथा मायक्रोवेव्ह भट्टीची

आज बऱ्याच घराघरातून 'प्रतिष्ठेचे चिन्ह' म्हणून खरेदी केली जाणारी, 'मी मायक्रोवेव्हमध्ये शेंगदाणे भाजते/भाज्या बनवते/बटाटे उकडते','आम्ही हल्ली चहा कॉफी पण मायक्रोवेव्हमध्ये करतो.' असे शेजारणीपाजारणींना अभिमानाने सांगावेसे वाटावे अशी हीच ती 'सूक्ष्मलहरी भट्टी' उर्फ मायक्रोवेव्ह ओव्हन.

ऊर्जेचे अंतरंग-०४

ऊर्जेचे अंतरंग-०४: रासायनिक ऊर्जा

पदभ्रामकांना अंधार पडताच काळजी लागते ती सरपणाची. कारण जिथे रात्र काढायची तिथे उजेड पाहिजे, इंधन पाहिजे. ती गरज भागते सरपणाने. खेड्यातल्या लोकांचा अर्धा वेळ पाणी आणि सरपण गोळा करण्यातच खर्च होतो. सर्व प्रकारच्या सरपणांमध्ये ज्या प्रकारची ऊर्जा असते तिला 'रासायनिक' ऊर्जा म्हणतात. कारण हे की पदार्थांच्या रासायनिक स्थित्यंतरांतून त्या ऊर्जेचे विमोचन होत असते. पालापाचोळा, काटेकुटे, झाडझाडोरा, लाकूडफाटा, शेण्या-गोवऱ्या इत्यादी सर्व प्रकारच्या जंगलातून मिळणाऱ्या सरपणास जाळल्यावर विस्तव मिळतो ज्याचा उपयोग उजेडासाठी, उष्णतेसाठी करता येतो. खाली उरते राख आणि हवेत जाते ते कर्व-द्वि-प्राणिदाचे वायूप्रदूषण.

भगवद्गीता एक अनोखे पठण.

सर्व गीताप्रेमीना.

वरील कार्यक्रम सायंकाळी ५.३० ते ७.०० आहे याची कृपया नोंद घ्यावी. गेल्या पत्रात वेळ चुकीची लिहीली होती.

गुरुजी

"प्रेमाची गोष्ट" म्हणजे कॉय ??

कांही वर्षांपूर्वी "प्रेमाची गोष्ट" हे नाटक आलं होतं. लागू आणि निळु फुले ही नांवे पहाताच आम्ही ग्रुपने ते बघायला गेलो. पण नाटक फार वरच्या पातळीवरचे असल्यामुळे आमच्या डोक्यावरुन गेले .दोन दिवस अस्वस्थपणाने काढले मग ठरवलं, जसं दिसलं तसं लिहून काढायचं, कोणी जाणकार सांगेल समजावून! पण कसलं काय हो, अजून कोणी भेटलं नाही. निदान मनोगतावर तरी कोणी भाष्य करेल का ? तर वाचाच त्याबद्दल......

कनकेश्वर, खांदेरी आणि उंदेरी.

शनिवार दिनांक ३१ मार्च, रात्री आठला मिहिर, कूल, फदि, केशव, धुमकेतू, भक्ती, आरती, अनिता असे नऊ जण जमलो आणि दोन गाड्या घेऊन निघालो. कनकेश्वरास जाण्यासाठी पेण थळ मार्गावरच्या मापगाव या पायथ्याच्या गावी जायचे होते. पुणे- लोणावळा - खोपोली - पनवेल असा एक्स्प्रेसवेने प्रवास करून पुढे मुंबई ग़ोवा महामार्गाने पेणला पोहोचलो. खोपोली पेण रस्ताही नुकताच खूप छान केला आहे, त्याने गेल्यास बरेच अंतर वाचते.

मैंने प्यार किया - सुरुवात

माझ्या बायको या लेखाला कॅची शीर्षक दिल्यानंतर ज़े प्रतिसाद आले, त्यावरून लेखाचे शीर्षक किती महत्त्वाचे असते, याची ज़ाणीव झाली. हा लेख तुम्ही वाचायला सुरुवात करण्यापूर्वीची 'वॉर्निंग'सुद्धा शीर्षकाशी सुसंगत अशा रंगातच लिहितोय बघा!! 'सुपूर्त करण्याआधी वाचून पहा',ही सुविधा अशा लेखांसाठी किती आवश्यक आहे, हे सुद्धा ज़ाणवले. प्रस्तुत लेखाचे शीर्षक पाहून यावर किती वाचकांच्या उड्या पडणार आहेत, त्याचाही अंदाज़  बांधता आला. एकूणच या लेखाच्या शीर्षकापासून ते शेवटापर्यंतच्या सगळ्याची पाळेमुळे आधीच्या 'बायको'त गुंतली आहेत. त्यामुळे लेखाची प्रेरणाही तीच समज़ावी.

मराठी नाटक 'माझ्या वाटणीचं खरं खुरं'

ललित, मुंबई सादर करत आहे
एक दीर्घांक
'माझ्या वाटणीचं खरं खुरं'
लेखन: मनस्विनी लता रवींद्र
दिग्द.: सतीश मनवर
नेपथ्य: प्रवीण भोळे
प्रकाशः विनोद राठोड
संगीतः शैलेंद्र बर्वे
कलाकार: अक्षय पेंडसे, विनोद लव्हेकर, नीरजा पटवर्धन आणि जितेंद्र जोशी
प्रयोगाचा कालावधी: १ तास ३० मिनिटे
दिनांक: ६ एप्रिल २००७
स्थळ: आविष्कार, माहिम म्युनिसिपल स्कूल, माहिम (प.),  मुंबई
वेळ: सायंकाळी ७:३० 
देणगी प्रवेशिका प्रयोगाच्या आधी एक तास प्रयोगस्थळीच मिळतील.