आखाती मुशाफिरी (१८)

 मी देखील धावत तिथे पोहोचलो तर स्टुअर्ट साहेब जमीनदोस्त झाले होते.
------------------------------------------------------------------------
           स्टुअर्ट साहेब धडपडले खरे पण थोडक्यात बचावले. खांद्याला आणि डाव्या हाताच्या कोपराला मुका मार बसला एवढेच. पण या अपघाताचा बाकी इतर वाढाचार झाला तो मात्र तापदायक ठरला. इदी आणि त्याच्या अन्य सहकार्‍यांनी आमचे काम तात्काळ बंद केले. आता सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला. असा अपघात होऊ शकतो असे आम्ही (कंपनीने) गृहित धरले होते किंवा नाही? तसे घडण्याची शक्यता गृहित धरली असेल तर खबरदारीचे काय उपाय योजले होते? जी माणसे काम करीत होती त्यांना विमा  उतरवला होता की नाही..? एक ना दोन अनेक प्रश्नांना वाचा फुटली. मुदीर नुकताच मुख्यालयात पोहोचला होता त्याला तातडीने पुन्हा परत कारागृहाकडे धांव घ्यावी लागली त्यामुळे तो संतापला. कारागृहाच्या आरक्षींनी तर वेगळीच शंका उपस्थित केली ती म्हणजे हा अपघात होता की घातपात? त्यांनी त्यांच्या पद्धतीने निराळी चौकशी सुरू केली. चौकशीला सगळेच कामगार एका वेगळ्या खोलीत नेले गेले. तिथे काय चालले आहे ते पहावे म्हणून मी तिकडे गेलो तर महादूच्या अंगात संचार झालेला. पोलीसच ते. पोलीस भारतातला काय आणि आखातातला काय. सगळे पोलीस सारखेच. त्यांना दंडुका परजायची फक्त संधी मिळायला हवी. आणि त्यातल्या एका काळुबाचा महादूवर दात होताच. दोघांनाही एकमेकांची भाषा समजत नव्हती. पण समजत नव्हती ती शब्दांची भाषा. बाकी दोघांचाही आवेश इतका जबरदस्त की, ’ शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ या मराठी गीताचा अर्थ  नव्याने समजावा. मला पाहतांच महादू कडाडला,

विधानपरिषदेत फडकला मराठीचा झेंडा!

काल म.टा. मध्ये ही बातमी वाचायला मिळाली. तीवर विचारांची देवाणघेवाण करता यावी म्हणून ती येथे उतरवून ठेवलेली आहे.

म.टा.तली मूळ बातमी : विधानपरिषदेत फडकला मराठीचा झेंडा!
म. टा. प्रतिनिधी दि. ३१ मार्च २००७,

आखाती मुशाफिरी (१७)

उद्यापासून मला तीन निरनिराळ्या रंगाची माकडे संभाळायची होती.
तीन काळी. चार लाल मातीतली आणि एक थेम्सच्या कांठावरचा गोरा हुप्प्या.
----------------------------------------------------------------

           नव्याने येणार्‍या गोर्‍या माणसाबद्धल मी गोरा हुप्प्या असे म्हणालो होतो ते विनोदाने म्हणालो होतो हे जरी खरे असले तरी त्या मागे अनुभवाची एक कटुताही होतीच. या देशाला ब्रिटिशांनी जरी स्वायत्तता बहाल केली असली तरी नवनिर्माणाच्या प्रक्रियेत आपले वर्चस्व ठेऊनच. बहुतेक सर्वच क्षेत्रात गोर्‍यांचा वरचष्मा जोपासलेला होताच. स्वदेशात एका तेलाखेरीज अन्य कांही उत्पादन होणे अशक्यप्राय होते आणि त्या मुळे बर्‍याचशा बाबतीत आखाती देश गोर्‍यांवर अवलंबून होते आणि ज्या गोष्टी स्वदेशांत उत्पन्न होत नव्हत्या त्या गोर पुरवीत होते. नव्हे, घ्यायला अरबांना भाग पाडीत होते. वरच्या श्रेणीचे तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ गोरेच पुरवीत होते आणि तेही अगदी दादागिरीने. बरे हे गोरे तंत्रज्ञही फार कांही वकूबाचे असत असे नाही. अगदी सुमार दर्जाची गोरी माणसे तिकडून इकडे पाठवली जात आणि केवळ गोरे आहेत म्हणून दादागिरीने वागत. आशियाई लोकांना तर ते अगदी कस्पटासमान वागणुक देत.

शब्द लाघव.

शब्द हे कधी कधी सजीवाप्रमाणे आपल्या मनाशी बोलत असतात. काही शब्दांचा उच्चार केला तरी मन प्रसन्न झाल्यासारखे वाटते.

मला मराठीतील काही शब्द फार आवडतात. त्यांचा उच्चार आणि शक्य असेल तेथे वापर मला आणि इतरांनाही प्रसन्नता देतात असा माझा अनुभव आहे.

पाणी

सलग तिसऱ्या वर्षी पावसानं हुलकावणी दिली तसा गिरधर चिंतेत पडला. असं नव्हतं की, पावसानं सायखेड्याला कधीच हुलकावणी दिली नव्हती. त्याच्या पस्तीस वर्षांच्या आयुष्यात तशी वेळ दोन-चारदा आली होती. पण त्यात पीक-पाण्याचं फारतर दोन-तीन आण्याचंच नुकसान व्हायचं. आत्ता मात्र तसं नव्हतं. दोन वर्षांच्या आधीच्या वर्षी पाऊस पडला; पण कमी. पीकं कशीबशी तगली. गेल्याच्यागेल्या वर्षी पीकं आठ आणेच आली. त्याच्यानंतरही तशीच स्थिती. यावर्षी तर तीही नाही. सगळी रानं करपून गेली पार. बीसुद्धा राहिलं नाही.

श्रीमद्भगवद्गीता एक अनोखे पठण

सर्व गीताप्रेमीना

१४ एप्रिल २००७ शनिवार, रोजी, सायंकाळी ५.३० ते ७.००, वनिता समाज, दादर, ( पश्चिम ) मुंबई, येथे  " श्रीमद्भगवद्गीता एक अनोखे पठण " हा एक अनोखा कार्यक्रम होणार आहे. अवश्य लाभ घेणे.

गुरुजी

याला काय म्हणावे?

१,८८,८२,८६२.०० रुपये स्टेट बँकेच्या खात्यांमध्ये.

२३,२०,०००.०० रुपये बॉण्डमध्ये.

५,३५,८१४.०० रुपये टपाल खात्याच्या बचत योजनेत.

(एकूण दोन कोटी सतरा लाख अडुतीस हजार सहाशे शहाहत्तर रुपयांची रोख गुंतवणूक.)

शिवसेना: स्थानीय लोकाधिकार

स्थानीय लोकाधिकार समितीला ३२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत शिवसेनेने महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिक लोकांना ८० टक्क्यापेक्षा जास्त प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशी मागणी केली आहे.

तुमचे मत ?

भआजच्या टाईम्स ऑफ़ ईडिया मधे एक लेख आला आहे. भारताचे क्रिकेट व हॉकी या बद्दलचा लेख आहे.

या मधे लेखकाचे मत आहे की भारतीय हॉकीला उतरती कळा लागली कारण हॉकी मधे कौशल्या पेक्शा ताकदी ला महत्त्व आले आहे तीच गत क्रिकेट मधे होते आहे.

माध्यमिक मराठी!

संदर्भ १) : आजच्या मटाची मुंबई टाईमस् ही पुरवणी.
पृष्ठ क्र १. 'गुणवान गरीब खेळाडूंसाठी कॉलेजेस उतरली मैदानात' ही बातमी.

या बातमीत खालील इंग्रजी शब्द/वाक्यं आढळली-

१) मूळ शीर्षकच 'गुणवान गरीब खेळाडूंसाठी कॉलेजेस उतरली मैदानात' असं आहे!
२) रिक्षा ड्रायव्हर
३) करिअर
४) कॉर्पोरेट जगत
५) स्पॉन्सरशीप
६) सोर्टस् विभाग
७) युनिव्हरसिटी
८) प्लॅन आखणे
९) नोकरीच्या ऑफर्स
१०) अटेंडन्स
११) वर्ल्ड कप
१२) स्पोर्टस् इव्हेन्ट
१३) क्रिकेटफॅन्स