http://farm1.static.flickr.com/168/388787942_ccda1c1c06.jpg
प्रेमदिन - अर्थातच Valentine Day!!
फेब्रुवारी महिना सुरु झाल्या झाल्या वेध लागतात व्हॅलेन्टाईन डे चे. पहिला आठवडा संपला की माझी फ़िल्डींग सुरु होते. टिव्ही, नेट, मासिकं……. जिथे कुठे ह्या प्रेमदिनाची जाहिरात दिसेल तिथे त्या जाहिरातीचं analysis करायला सुरवात करायची म्हणजे संभाषणाची गाडी बरोबर रुळावर येते (मला हव्या त्या दिशेला
) . मग हळूच …..
" अवी…माझ्या मैत्रिणीला ना (बरेचदा काल्पनिक) तिच्या नवर्याने व्हॅलेन्टाईन डे ला ना…..इतकं मस्त सरप्राईज दिलं"
"आम्ही मैत्रिणी आज व्हॅलेन्टाईन डे बद्दल बोलत होतो ना…..( असे लाडिक ‘ना’ लावले की नकार यायची शक्यता जराशी कमी होते म्हणून ह्या ‘ना’ चा वापर जास्त ;)) तेव्हा त्या सगळ्या म्हणाल्या, "तुझा नवरा तर नेहेमीच मस्त गिफ़्ट्स देतो" (खरं तर ह्या ‘देतो’ ह्या शब्दाऐवजी ‘तू लुबाडते’ असा शब्दच चपखल बसतो
)"
नवर्याचा अशावेळी अत्यंत सावध हुंकार येतो. म्हणजे आता ह्यावर्षी बाईसाहेबांच्या अपेक्षा ‘माफक’ ह्या शब्दाच्या किती पुढे गेल्या आहेत ह्याचा अंदाज घेत घेत आमच्या एकतर्फ़ी संभाषणाला continue करतो.