दाण्याची आमटी

वाढणी
२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • १ वाटी भाजलेले दाणे
  • १ चमचा साजूक तूप, १ तिखट मिरची
  • २ चमचे चिरलेली कोथिंबीर, २ चमचे खवलेला ओला नारळ
  • १ चमचा जिरे, अर्धी वाटी चिंचेचे दाट पाणी
  • गूळ छोट्या सुपारीइतका
  • चवीपुरते मीठ

मार्गदर्शन

बेल्जियम कहाणी-३

                बेल्जियम मधे आल्यावर जी गोष्ट सर्वात जास्त जाणवते, ती म्हणजे इथले खाद्यपदार्थ! मी इथे येण्यापूर्वी असा कधीच विचार केला नव्हता की नुसता उकडलेला बटाटा हा जेवण म्हणून असू शकतो. इथे सगळे लोक उकडलेले दोन-तीन बटाटे घेतात आणि त्यावर अगदी नावापुरते मिठ, मिरपूड घालून मिटक्या मारत खातात. मला तर आश्चर्यच वाटते की असे नुसते बटाटे कसे जाऊ शकतात.

जन्मशताब्दी - फक्त वंदे मातरमचीच नव्हे...

नमस्कार मंडळी,


सर्वप्रथम वंदे मातरम् गीताला आणी त्यामुळे चालू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीला नमस्कार!


त्यावरून चालू असलेला तमाशा आपण वाचत असालच. सर्व सत्ताधारी या जन्मशताब्दीचा राजकीय फायदा उठवत आहेत. पण गंमत म्हणजे, अजून एक जन्मशताब्दी ११ सप्टेंबरला येत आहे, विशेष करून काँग्रसवाले विसरत आहेत (भाजपला काही पडले नसावे असे कदाचित चुकीचे पण गृहीत). जर असे लिहिण्यात माझी काही चूक होत असेल तर सांगा. नसल्यास जन्मशताब्दी कसली ते खाली पाहा

आक्रमक स्वभाव

नमस्कार !


प्रत्येकाचा स्वभाव निरनिराळा असतो, नाहीतर या जगण्याला मजा आली नसती.


मला जेव्हा कोणी विचारतो की तुझ्या स्वभावामधील कमतरता सांग (विशेषतः Personal Interview मध्ये) तर मी सांगतो की माझ्यात 'आक्रमतेचा अभाव' आहे.


नोकरीच्या सुरुवातीला माझ्या स्वभावातील ही कमतरता मला प्रकर्षाने जाणवली. दैनंदिन गोष्टींतही कोणी (अनोळखी) वरच्या आवाजात बोलले की मला तेवढाच आवाज चढवून प्रत्युत्तर देणे जमत नाही. मी शांतपणे त्या व्यक्तीस स्पष्टीकरण देतो.  अर्थात याचे कधी वेगळे परिणामही दिसायचे. कधी समोरची व्यक्ती लगेचच निवळायची किंवा आणखीनच गुर्मीत येऊन बोलायची.

गणपती बाप्पा मोरया!!!

बहुतांशी पावसाळ्याचे दिवस.. तशी शाळा सुरू होवून महिना दीड महिना झालेला .. सहामाही परिक्षा अजून चार कोसावर असते.. त्यामुळे अभ्यासाचं फ़ार लोड नाही... सकाळ मधे 'गणपतीच्या मुर्ती बाजारात' अशी एक बातमी.. सार्वजनिक गणपती उत्सवाची वर्गणी गोळा करणारे कार्यकर्ते..

वऱ्याचे तांदुळ

वाढणी
२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • १ वाटी वऱ्याचे तांदुळ
  • मूठभर दाण्याचे कूट,
  • मूठभर चिरलेली कोथिंबीर, मूठभर खवलेला ओला नारळ
  • १ तिखट मिरची, साजुक तूप २-३ चमचे
  • जिरे १ चमचा, ५ वाट्या पाणी
  • मीठ

मार्गदर्शन

मराठीतील क्रियापदांत लिंगवचनानुसार होणारे बदल

कृपया माझी मदत करा. मला एका मुलीला मराठी शिकवायचे आहे. त्यासाठी मराठीतील क्रियापदांत लिंगवचनानुसार होणा-या बदलांबद्दलचे नियम मला कोठे मिळतील? माननीय सभासदांनी मला याबाबत काही मदत काही मदत करावी अशी विनंती.

हृदयविकार-२२ मनोव्यवस्थापन

हृदयविकार-२२ मनोव्यवस्थापन


प्रस्तावनाः इथे केवळ हृदयधमनीअवरोध ह्या विकारासंदर्भात चर्चा केलेली आहे. तरीही तिचा उपयोग इतर अवनतीकारक रोगांकरितासुद्धा होऊ शकेल.


श्रेयअव्हेरः हा वैद्यकीय अथवा मनोव्यवस्थापन विषयक सल्ला नाही. तशी माझी पात्रता नाही. हे केवळ अनुभवातून आलेले शहाणपण आहे.

कंबोडीयाचे हिंदू साम्राज्य (भारताची एक प्राचीन वसाहत)

हिंदू धर्म हा जरी जगातला एक पुरातन धर्म समजला गेला तरी इतर धर्मांसारखा या धर्माचा प्रसार मात्र भारताबाहेर फारसा झाला नसल्याचे अनेकदा ऐकू येते. त्यामानाने हिंदू धर्माची एक उपशाखा मानावी  अशा बौद्ध धर्माचा प्रसार मात्र दूरपर्यंत झालेला दिसतो. हिंदू धर्म खरंच भारताबाहेर गेला  की काय याचा विचार केला असता उत्तर 'तसा तो भारताबाहेरही पसरला' असे येते. हिंदू धर्म एके काळी पूर्वेकडील देशांत पसरला होता, समृद्धीस आणि भरभराटीस आला होता असे दिसून येते. यावर वाचनात आलेला वाल्मीकी रामायणातील एक संस्कृत श्लोक पुढे उद्धृत केला आहे.