वाढणी
५ जण
पाककृतीला लागणारा वेळ
15
जिन्नस
- केळी ५
- रवा पाव किलो
- साखर ५ चमचे
- दुध १०० ग्राम
मार्गदर्शन
केळी, रवा, दुध व साखर एकत्र मिसळुन पातळ सारण करावे.
(जास्त पातळ करु नये, थोडे जाडसर असु द्या)
मग हे सारण कुकरच्या डब्या मधे लावावे (कुकरची शिटी काढुन टाकावी)
३ शिट्या झाल्यावर व कुकर थंड झाल्यावर डबा काढुन (डब्यामधेच) वड्या कराव्यात.
झाल्या वड्या तयार.
आवडल्यास नक्की प्रतिसाद द्यावा