तमाम भारतीयांच्या अनंत गांण्यांमुळे लाडक्या झालेल्या आशाला ७३ वर्षे पूर्ण झाल्याबद्द्ल हार्दीक अभिनंदन आणि पुढे त्यांनी असेच गात राहात नवे नवे विक्रम करावेत आणि आमच्या सारख्या सामान्यांना चार कटकटीच्या घटका व्यसनाधीन न होता आपल्या गाण्यांमधे विसरायला लावाव्यात म्हणून शुभेच्छा!
मी असे ऐकले आहे की कोकणस्थ ही जमात इंग्रज माणूस (एंग्लो-सॅक्सन, इंग्रज पण जर्मन मूळ, केल्टीक नव्हे) व कोकणी स्त्री यांच्या संबंधातून उदयास आली. डी. एन. ए. च्या अभ्यासातून हे सिध्द झाले आहे, हे खरे का?
या वर्षी मी म्हटल्याप्रमाणे (http://www.manogat.com/node/7276) ब-याच सार्वजनिक मंडळांनी आणि घरी गणपतीची स्थापना करणा-यांनी पुष्कळ 'इकोफ्रेंडली' पणा दाखवला. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ठाणे , पुणे यांसारख्या शहरांत गणेश विसर्जनाकरता काही ठिकाणी कॄत्रिम तलावही तयार करण्यात आले होते. गेले १० दिवस वर्तमान पत्रात येणा-या ठिकठिकाणच्या माहितीवरून एकूणच असे लक्षात आले की हळूहळू जनजागॄती होत आहे. काही सार्वजनिक मंडळे स्वतःहून मुर्तीच्या उंचीवर बंधने पाळत आहेत. गुलालाचा वापर टाळत आहेत. आलेला सगळाच पैसा उधळून न टाकता जमेल तशी समाजसेवा पण करत आहेत. ह्या सगळ्या मंडळांचे मिळून एकूण प्रमाण कमी असेल पण हे ही नसे थोडके. निदान सुरूवात तर झाली आहे.
एका ठिकाणी सत्यनारायणाची कथा सुरू होती. धनसंपत्तीऐवजी लतापल्लवाने भरल्यामुळे आपली नौका पाण्यातून वर आलेली साधुवाण्याने पाहिली हे ऐकल्यावर मला आर्किमिडीजच्या सिध्दांताची आठवण झाली. आरती, तीर्थ प्रसाद ग्रहण वगैरे झाल्यावर गप्पा मारतांना सहज ते माझ्या बोलण्यात आलं.
दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या वंदे मातरम् च्या सोहळ्यात "माननीय, परमपूजनीय सोनियाजी गांधीजी" आणि "आदरणीय, हुशार, तडफदार, देशभक्त पंतप्रधान मनमोहनसिंग उपस्थित राहू शकले नाहीत.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.