हिवाळ्यात जुनागड जवळच्या गिरनार पर्वता वर जायचे ठरले आणि मी लगेच होकार दिला . ठरल्या प्रमाणे ५ जानेवारी २०१८ ला रात्री ९:४५ च्या वेरावल एक्स्प्रेस ने जुनागड ला प्रवासासाठी मी न्यायते सर, शुभदा न्यायाते, सीमा केतकर, खोले सर, प्रसाद सर्वटे, स्वाती फडणीस आणि डी. आर. पाटील सर असे आठ जण जमणार होतो. मी आणि पाटील सर स्टेशन वर दोन तास आधी पोचलो होतो, बहुतेक सर्व जण ओफीस मधून थेट मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्टेशन वर येणार होतो ,आम्ही रेल्वे स्टेशन वर थोडा चहा-नाश्ता घेतला. गाडी अगदी वेळेवर सुटली. ट्रेनने बोरीवली स्टेशन सोडल्यावर आम्ही जेवणाचे डबे सोडले.