वेळ जात नव्हता म्ह्णून मित्राच्या घरी पुस्तक वाचत बसलो होतो. तेव्हढ्यात वहिनींनी हाक मारली "चहा तयार आहे".
पुस्तकात खुणेचा कागद ठेवून मी स्वयंपाकघरात टेबलावर जाऊन बसलो. चहा घेताना वहिनींची अस्वस्थता जाणवली म्हणून विचारलं "काय झालं वहिनी?? "
डोळ्याच्या पाणावलेल्या कडा पुसत त्या म्हणाल्या, "सांगते पण मला माफ कराल ना"
मला काहीच उमजेना, मी म्हणालो "अगं तुझा नवरा मला मित्र असला तरी भावापेक्षा जास्त प्रिय आहे, निःसंकोचपणे सांग काय ते"