समर्थ रामदास स्वामींनी, मनुष्य जातीचे विभाजन हे त्यांच्या गुणावगुणांप्रमाणे चार प्रकारात होते असे म्हणले आहे. जे अवगुणी आहेत, त्यांच्या विकार, दोषात बंदीवान आहेत, अशांना "बद्ध जन" असे संबोधिले आहे. त्यांच्यात काही बदल घडल्याने अथवा स्वतःच्या दुर्गुणाची जाणीव झाल्याने त्यांना पश्चात्ताप होतो. स्वतःमध्ये काही सुधारणा व्हावी अशी इच्छा जागृत होते. अशा व्यक्तींना "मुमुक्ष" असे संबोधिले आहे. मुमुक्ष जेव्हा संतसज्जनांच्या संगतीत राहून ज्ञानसाधनेचा मार्ग अनुसरतात तेव्हा त्यांना "साधक" म्हणले जाते .