श्री समर्थ रामदास स्वामी यांनी, मनामध्ये काही एक संकल्प धरून दासबोध ग्रंथाची रचना करण्याच्या प्रकल्पाला सुरूवात केली होती. वैराग्यवृत्तीने जगताना, संपादन केलेले ज्ञान आणि अनुभव ते ग्रंथामध्ये अंकीत करीत होते. गोसावी वृत्तीने सर्वसंचार करीत असताना, पाहिलेले, ऐकलेले आणि समजलेले सारे सारे काही ते श्रोत्यांना आणि शिष्यांना सांगत होते. अपेक्षा एकच होती, ऐकणाऱ्याने त्यातून बोध घ्यावा, स्वतःबरोबरच इतरांचेही जीवन सुखी आणि संपन्न करावे.