श्री समर्थ रामदास स्वामीं ज्ञानदानाचे पुण्यकर्म अखंडित आचरत होते. जनसामान्याचे अज्ञान, त्यापोटी निपजलेला अंधविश्वास आणि अनाचार यांचा विनाश व्हावा, हीच त्यांची तळमळ होती. अत्यंत निःस्वार्थ आणि विरागी वृत्तीने ते हे कार्य करीत होते.
संसारचक्रात गुंतून अनेक दुःख चिंतांचे भारवाही झालेले जन त्यांना पाहवत नव्हते. त्यांना मुक्ती मार्गाची दिशा गवसावी म्हणून गूढ आणि क्लिष्टं असे ब्रम्हज्ञान त्यांनी सोप्या, जनसामान्यांच्या भाषेत रूपांतरित केले.