सुमारे वीस वर्षांपूर्वीची हकीगत आहे. '"मेरी आवाज सुनो"", ""आवाज की दुनिया"" हे कार्यक्रम तेव्हा नवीन होते. नवीन होते म्हणून लोकांचे आकर्षण होते. लोकांकडून कॅसेट मागवणे, ती तपासून आवाज योग्य वाटला तर स्पर्धकाला बोलावणे हे प्रकार अनोखेच होते. त्याच सुमारास विविध क्लब, सामाजिक संस्था स्वतःच्या गायन स्पर्धा प्रचंड संख्येने आयोजित करू लागल्या होत्या. परीक्षक , हॉल व वाद्यवृंद या तीन गोष्टी मिळवल्या की झाली आयोजित स्पर्धा, अशी समजूत वाऱ्याच्या वेगाने पसरलेली होती. अशातच एका संस्थेने एक स्पर्धा आयोजित केली. मी त्यात भाग घेतला.