एक थरारक अनुभव...(भाग चौथा)

जिना प्रशस्त दिसत असला तरी मोडलेल्या पायऱ्यांवरुन वरच्या मजल्यावर जायला दिव्य करावं लागणार हे कळून चुकलं होतं. परागने पायऱ्यांवरून बॅटरीचा झोत वर सरकवला तसे आम्हां सर्वांचे लक्ष भिंतीवरल्या रोमन घड्याळाकडे गेलं. काही आकडे गायब झलेल्या त्या घड्याळाचे काटे बारावर स्थिरावले होते...

एक थरारक अनुभव...(भाग तिसरा)

" लय भारी, एकदम झक्कास आयडिया, यार!" पोप्या ओरडला. पोप्या जणु काही सगळ्यांच्याच मनातले बोलला होता. तळ्यापासून दूर, पण गाडीपासून जवळ असलेला तो निर्मनुष्य वाडा- मुबलक चंद्रप्रकाश असलेली दुसऱ्या मजल्यावरची गच्ची- सगळ्यांना एकदम पसंत पडली. "मान गये, शिऱ्या! पण..." स्वप्नीलच्या मनात शंकेची पाल चुकचुकली...

उषःकाल होता होता.....

उषःकाल होता होता.....

एक हाडाचे पत्रकार, ज्येष्ठ लेखक, आणि ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - श्री. अरुण साधू यांच्या 'सिंहासन' ह्या राजकीय कादंबरीवर अधारीत जब्बार पटेल यांच्या 'सिंहासन' मधील हे चित्रपट गीत...

पुणेकरांसाठी कोड ऑफ कन्डट

मला ई-मेलने आलेले हे "पुणेकरांसाठी कोड ऑफ कंडक्ट" मनोगतींसाठी इथे देत आहे. मूळ लेखक अज्ञात.

Code of conduct4Punekars

ईर्शाळगड

ईर्शाळगड

पुणे-मुंबई गाडीने जाताना खोपोली ते पनवेल किंवा आगगाडीतून जाताना कर्जत ते पनवेल ह्या मार्गावर डावीकडे दोन सुळके दिसतात. (फोटो) टेबलावर दोन व्यक्ती बोलत आहेत असे वाटते. हाच ईर्शाळगड. प्रबळगडाच्या जवळ असणारा हा गड म्हणजे चौकीचे ठाणे असावे.
डावीकडचा सुळका हा दक्षिण दिशेला आहे.. तर उजवीकडचा उत्तरेकडचा (धरणाच्या बाजूकडचा) (
फोटो)

ह्या गडावर वरती एक नेढे (फोटो), ३ टाकी, देवाची मूर्ती (फोटो) आणी ५-६ जण झोपू शकतील अशी एक गुहा आहे. सर्वात वरती जायला दोर वैगरे असे रॉक क्लांयबींगचे साहित्य लागते.
गडावरून लांबवरचा प्रदेश दिसतो.. त्यात कर्नाळा (
फोटो), माणीकगड(फोटो), चंदेरी, म्हसाळ (फोटो), माथेरान, प्रबळगड (फोटो) असे गड किल्ले दिसतात.

गडावर जायचा मार्ग एकदम सोपा आहे. चौक गावाजवळून हा रस्ता जातो. चौक गावाबाहेर गावचे रेल्वे स्टेशन आहे.. ते स्टेशन ओलांडून मागचा रस्ता पकडवा. (विकीमॅपीया) नानवली गावातून हा रस्ता जातो. समोर दिसणारी सोंड ही नजरेसमोर ठेवावी... त्या सोंडेवरून वरच्या वाडीला रस्ता जातो.. स्टेशन वरून डांबरी रस्ता जातो तो थेट धरणाकडे. मध्येच सोंडेकडे जायचा फाटा फुटतो.. जर सोंड धरून चाललो, तर हा फाटा चुकणार नाही.. हा फाटा सरळ एका गावातून जातो. हे गाव बहुतेक मोरबे असावे. धरणामुळे विस्थापित झाले असावे.. गावची आखणीच हे सांगून जाते. आखलेले रस्ते, घराचे कुंपण, पाण्याचे पाइप रस्त्याच्या कडेने नेलेले आहेत, हे सर्व मोजून मापून केले आहे.. नाहीतर गावे अशी आखीव कधी दिसत नाहीत. ह्या गावपर्यंत गाडी घेऊन जाऊ शकतो. (खालून गडाचा फोटो)
ह्या गावातूनच सोंड वर चढते. (
गडावरून दिसणारा मार्ग) चढण तशी खडी आहे. सावलीला झाडे आहेत. पण पुरेशी नाहीत.. त्यामुळे उन्हाळ्यात भर उन्हात चढणे टाळावे. खडी चढण, कोंकणातली दमट हवा ह्यामुळे पाणी पाणी होते. वरती चढतानाच वरची वाडी दिसायला लागते.
पठारावर वाडीत पोचायला जवळपास २ तास लागतात. (पावसाळी हवा आणी वेगात आल्यामुळे आम्ही सव्वा तासात वाडीत होतो) (
वाडी आणी गड)

वाडीत विहीर आहे. पण पाणी उन्हाळ्यातही असते का नाही ते कळले नाही. वाडीतून वरती गडावर जायला अर्धा-पाऊण तास पुरेसा आहे. (वाडीवरून दिसणार गड)

गडाचा रस्ता वाडीच्या डावीकडून आहे. गडाच्या डावीकडच्या सोंडेवरून रस्ता वरती चढतो. हा रस्ता नंतर काढला असावा. आधीचा रस्ता गडाच्या उजवीकडच्या सोंडेवरून असावा (उतरताना आम्ही तिथून उतरलो). चढताना डावीकडूनच चढावे. उजवीकडची वाट पटकन सापडणार नाही. हा रस्ता गडाच्या डावीकडच्या सुळक्याच्या मागे नेतो. जवळपास नेढ्याच्या खाली आले की वरती रस्ता जातो. आम्ही तिथे पोचलो तेव्हा ढग असल्यामुळे आम्ही पुढे गेलो. पण रस्ता चुकलो हे ध्यानात येताच मागे फिरलो. जरी चुकलात तरी तुमची गडाला प्रदक्षिणा होईल. चौक मधून वाडीवर येतानाचे दिशादर्शक बाण वाडी ते गड ह्यात अजिबात दिसत नाहीत. (सुरुवातीचा पॅच)
इथून वरती चढताना जरा रॉक पच आहे. उन्हाळ्यात तो काहीच अवघड नाही पण पावसाळ्यात हाच निसरडा होतो. आम्ही गेलो तेव्हा पावसाळा सुरू झाला होता. आम्हालाही पाऊस लागला. त्यामुळे पॅच जरासा निसरडाच होता.
वाटेतच पहिले टाके लागते. त्यात बर्‍यापैकी पाणी होते. पूर्ण गडावर दिसलेले हेच नितळ पाण्याचे टाके. बाकीच्या टाक्यात शेवाळे आहे. टाके उजवीकडे लागते तर शेंदूर फासलेला देव डावीकडे. टाक्याच्या इथूनच एक ५-६ पायऱ्यांची शिडी लावलेली आहे. (
शिडी, शिडी चढताना) दगडापेक्षा त्या शिडीचीच भीती जास्ती वाटली.. नुसती टेकवून ठेवल्याने कधी पडेल हे सांगता येत नाही.. त्यामुळे चढताना डोंगराच्या बाजूसच भार देऊन चढावे लागते. हा रॉक पच शेवटी नेढ्याला जाऊन थांबतो.

नेढ्यातून समोर मोरबे धरण, वाडी, वैगरे नयनरम्य परिसर दिसतो.. (फ़ोटो१,फ़ोटो२) जरासा प्रयत्न केला तर नेढ्याच्या वरतीही जाता येते (फोटो). आताशी गडावर खूप ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत हे ही आढळून येते..(दरडीचा फोटो, आणी त्या दरडीत) नेढ्यालाही भेगा पडल्या आहेत.. त्यामुळे कुठेही आधार घेताना भेगा गेला नाही ना ते पाहूनच हात लावावा..
नेढ्याकडून उजवीकडे छोटासा रॉकपॅच चढला की दक्षिणेकडच्या सुळक्या च्या जवळ जाता येते.. हा भाग आणी सुळका ह्यात सलग रस्ता नाही.. त्यामुळे बहुतेक सुळक्याच्या पायथ्याशी जाणारा मार्ग वेगळा असावा. पाऊस आणी ढग ह्यामुळे जास्त पुढे जाऊन पाहता आले नाही..
परत उतरून नेढ्यात येता येते... नेढ्याच्या पलीकडून वाट उत्तरेकडच्या सुळक्यावर (धरणाच्या बाजूकडच्या) नेते.. वाटेवरच एक मोठे टाके आणी खोदिव गुहा दिसते.
पाण्यात शेवाळे भरपूर आहे.. त्यामुळे आधी येताना (रॉकपॅच चढताना) जे टाके दिसले तेच उत्तम आहे.
खाली उतरताना जिथून रॉकपॅच सुरू झाला तिथे उतरावे..

आल्या वाटेने परतही जाता येते.. पण आम्ही गडाला प्रदक्षिणा घालायची ठरवली आणी दुसरी वाट कुठली तेही पाहायचे ठरवले.. त्यामुळे धरणाच्या दिशेने (उत्तरेकडच्या सुळक्याच्या कडेकडेने) वाट जाते ती पकडली.. ती वाट सुळका जिथे संपतो तिथे पोचली. म्हणजेच गडाची अर्धी प्रदक्षिणा झालीच.. वाटेत अजून एक पाण्याचे टाके दिसले. आकाराने ते गुहेशेजारी जे टाके आहे त्याच आकाराचे आहे. तसेच ह्याच वाटेवर नेढ्याकडे जाणारी अजून एक वाट असावी असे दिसले. ही वाट बहुतेक रॉकपॅच वरील देव आहे तिथे निघत असावी.. ही वाट जिथे वरती चढायला सुरुवात केली तिथून ५० मी. वरच आहे.. ही वाट, टाके.. ह्यामुळे असे वाटते की गडावर यायची जुनी वाट ही वाडीतून उत्तरेकडच्या सुळक्याला वळसा घालून असावी. आम्ही वरती लिहिल्याप्रमाणे वाडीतून डावीकडच्या वाटेने वरती आलो.. गावकर्‍यानीही तीच वाट सांगितली होती. एक गावकरी म्हणाला की उजवीकडून तुम्हाला वाट घावनार नाही. ती वाट कुठली हे पाहण्यासाठीच आम्ही इकडे आलो. (फोटो).
ही वाट आता बर्‍याच दरडी कोसळल्यामुळे वापरात नाही.. कदाचित धरणाच्या कामात सुरुंग फोडले त्यामुळेही दरडी कोसळल्या असतील
हीच वाट सुळक्याच्या टोकावरून खाली उतरत नाही.. सुळक्याला वळसा घालून परत सुळक्याच्या कडेकडेने दक्षिणेकडे जाते (यू टर्न). आणी तिथूनच एक सोंड वाडीत उतरते.

परत येताना रेल्वे स्टेशन ओलांडून पुणे मुंबई महामार्गावर यावे. तिथून खोपोली वा कर्जत ला जायला ६ सीटर मिळतात.. कर्जत ला जाणार्‍या रिक्षा जास्त आहेत.. आम्हाला अर्ध्या ते पाऊण तास थांबावे लागले. कर्जत-पनवेल वा खोपोली-पनवेल अशा ह्या रिक्षा चालतात.. त्यामुळे पनवेललाही जाता येईल. पनवेल ला जातानाच शेडुंग गाव लागते.. तिथून प्रबळगडावर जाता येते..
खोपोली ते चौक हे रिक्षाचे आणी ST चे भाडे १०-११ असे आहे.

इर्शाळगडावरुनही एक वाट प्रबळगडावर जाते (फोटो).१.५ दिवसात प्रबळगड आणी ईर्शाळगड होऊ शकतो.. शनीवारी संध्याकाळी रात्री ईर्शाळगडावर मुक्काम करता येईल. रवीवारी सकाळी प्रबळगडावर जाता येईल. हे अंतर पुस्तकात लिहिल्याप्रमाणे ३ तास आहे.

प्रबळगडाचा पसारा तसा मोठा आहे. (प्रबळगडाचे फोटो) पण महत्त्वाची ठिकाणे पाहून ३-४ वाजता परत गडावरून उतरता येईल. शेडुंग ते प्रबळगडाचा पायथा ह्या वाटेवरही संध्याकाळ ६:३०-७ पर्यंत रिक्षा चालतात.

:-आनंद

हसा पण लठ्ठ होऊ नका

बस थांब्यावर बस उभी होती. एका सरदारजीने कंडक्टरला विचारले,

" विल यू टेक मी टू जालंधर प्लीज ?

" विच पार्ट. " कंडक्टर.

" ऑफकोर्स, होल ऑफ माय बॉडी ' सरदारजी

gurujee

शिक्षण- 'आनंदक्षण'

नमस्कार,

हल्ली गावांमध्ये तरुणांची वर्दळ  दिसत नाही, नाही का? गावातल्या चावडया, कट्टे, बुजूर्ग लोक व्यापून असायचेच पण तरुणही असायचे. आता तसे दिसत नाही.

तरुण लोक गावात न दिसण्यामागे काय कारण असावे? 'गावात नौकरी मिळत नाही', 'कमाईची साधने नाहीत' - ही कारणे  वर पाहता दिसतात. पण खरेच तसे आहे का? आणि असेल तर काय?

लायसन्स, एक गुलबकावलीचे फूल

समजा आपण चालवत असलेलं वाहन, सिग्नल लाल झाल्यावरही न थांबता पुढे गेलं. म्हणजे अशी चूक आपल्याकडून होणं शक्यच नसतं, पण गाडीच वेळेत थांबू शकली नाही (चूक नेहमी गाडीचीच असते) आणि आडवळणाला बसलेला समस्त वाहनचालकांचा मामा, हातवारे करत आपल्याला थांबवायला लागला, (आणि आपण थांबलोही) तर तो आपल्याकडे सर्वप्रथम कोणती वस्तू मागेल? अचूक ओळखलंत. ड्रायव्हिंग लायसन्स.

भारतात असेपर्यंत ते लायसन्स मिळवणे आणि ऐच्छिकरीत्या ते जवळ बाळगणे किंवा न बाळगणे ह्यात कठिण असं काही नव्हतंच. त्या सर्वातलं काठिण्य "चिरी मिरी" ह्या एका संकल्पनेनं नष्ट करून टाकलं होतं. पण भरताबाहेर अशी संकल्पना अस्तित्वात असल्याची खात्री नव्हती आणि असलीच तरी ती आपल्या खिशाला परवडणार नाही ह्याची खात्री होती. त्यामुळे इथे माझ्या किंवा गाडीच्या चुकीने सिग्नल तुटलाच, इथल्या मामाने (खरंतर अंकलच म्हणायला हवं) थांबवलंच, तर त्याला भारतीय लायसन्स कसं दाखवायचं?

मुळात तसं मी ते दाखवलंच तर ते लाल रंगाचं पुस्तक म्हणजेच लायसन्स असल्याचं त्याला पटवून द्यावं लागेल. समजा त्याला ते पटलंच आणि त्याने ते उघडून वाचलं, तर आत लिहिलेली अगम्य लिपी त्याला समजावी तरी कशी? आणि समजा ती लिपी रोमन असून भाषा इंग्रजी आहे, हेही मी त्याला पटवलं. तरी काय लिहिलंय हे फक्त लिहिणाऱ्यालाच कळावं (बहुदा त्यालासुद्धा कळू नये) अशा सांकेतिक पद्धतीने लिहिलेलं असल्यामुळे, ते वाचणं किंवा वाचून दाखवणंही अशक्य कोटीतलं होतं.

राहून राहून माझा फोटो मात्र त्या अंकलला दिसला असता. पण तो अठराव्या वर्षी काढलेला असल्याने, आणि माझ्या आणि त्या फोटोच्या वयोमानात आणि माझ्या आकारमानात आणि वस्तुमानात बराच फरक झालेला असल्याने, त्या फोटोतला तो मीच हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा माझ्याजवळ नसल्याने, इथे नवं ड्रायव्हिंग लायसन्स काढावं हे उत्तम, हे मी ठरवलं.

त्या अनुषंगाने मी माहिती काढायला सुरवात केली. काही अनुभवी व्यक्तींनी मला ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून लायसन्स काढायचं सुचवलं. पण मला गाडी चालवता येत असताना, असल्या कोणत्याही स्कूलचा विद्यार्थी होणं माझ्या तत्त्वात बसणारं नव्हतं. आणि ते ड्रायव्हिंगचे धडे आणि परीक्षेकरता आकारत असलेली फी बघून, मी ही फी वाचवली तर तेवढ्यात एक सेकंड हँड खटारा गाडी येऊ शकेल, हे माझ्यातल्या एकारांताने बरोबर ताडलं. त्यामुळे मिशन लायसन्स स्वतःच पूर्ण करण्याचं मी ठरवलं.

पुढे अशी माहिती हाती आली की लायसन्स मिळवण्याकरता तीन परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. देशात लायसन्स मिळवण्यासाठी द्यावयाच्या परीक्षेशी तुलना करता, बहुतेक इथे लायसन्स म्हणून बॅचलर ऑफ ड्रायव्हिंगची पदवी देत असावेत असा एक विचार मनात येऊन गेला आणि मी काळी कोट टोपी घालून लायसन्सदान समारंभात माझं लायसन्स स्वीकारतोय वगैरे बाष्कळ विचार माझ्या मनात तरळायला लागले. अपुरी स्वप्न अशी नको तिथे डोकं वर काढतात बघा.

मग पुढे असं कळलं की पहिली परीक्षा म्हणजे थिअरी. म्हणजे सगळे नियम वगैरे पाठ करून जायचे आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची संगणकावर उत्तरं द्यायची. म्हणजे करोडपती कार्यक्रमाप्रमाणे काँप्युटरजी आपल्याला एक प्रश्न आणि चार उत्तरं देणार आणि आपण त्यातून योग्य पर्याय निवडायचा. फक्त दुर्दैवाने लाइफलाइन्स उपलब्ध नव्हत्या. दुसरी परीक्षा म्हणजे ड्रायव्हिंग सिम्युलेशनची. तुम्ही कधी गाडीचा व्हिडिओगेम खेळलायत का? तसाच व्हिडिओगेम समजा. फक्त हा गेम खेळायला घसघशीत रक्कम फी म्हणून भरायला लागते आणि पहिल्या प्रयत्नात चांगला खेळता आला नाही. म्हणजेच खेळता खेळता आपलाच गेम झाला, तर पुन्हा पुन्हा खेळावा लागतो, पुन्हा पुन्हा ऐसे भरून.

तर अंगभूत हुशारीमुळे म्हणा किंवा बालपणापासून व्हिडिओगेम्स खेळायच्या सवयीमुळे म्हणा, शंभरातील नव्याण्णव लोकांप्रमाणे मी पहिल्या दोन परीक्षा उत्तीर्ण झालो. म्हणजे खेळाडू जसे मुख्य सामान्याआधी सराव करतात तसा हा मुख्य ड्रायव्हिंगच्या परीक्षेचा सराव होता.

आता ड्रायव्हिंगची परीक्षा द्यायची म्हणजे पहिली सोय गाडीची करायला हवी. गाडी नाही तर मी मरायला लायसन्स का काढत होतो असा क्षुद्र विचार काही अतिउच्च बुद्धिमत्तेच्या वाचकांना पडल्यावाचून राहणार नाही. पण गंमत अशी होती, की माझे भारतीय लायसन्स इथे चार महिन्यावर चालत नाही, त्यामुळे गाडी नसली तरी घाईघाईने लायसन्स काढणे आवश्यक होते. पुन्हा तुम्ही अतिउच्च बुद्धिमत्ता असलेले वाचक असाल, तर तुम्हाला प्रश्न पडेल की, जर हाती गाडीच नाही, तर भारतीय लायसन्स नाही चालले तर बिघडते कुठे?

पण इथेच तर खरी गोम आहे. जर माझे भारतीय लायसन्स निरुपयोगी झाले असते तर ड्रायव्हिंगची परीक्षा देण्याकरता मला शिकाऊ म्हणजेच लर्निंग लायसन्स काढून महिनाभर चिपळ्या वाजवत बसावे लागले असते आणि मगच परीक्षा देता आली असती. शिवाय ह्या सगळ्या प्रकाराला बरेच पैसेही जास्त पडले असते. मी पडलो गरीब बिचारा नवखा स्थलांतरित (मायग्रंट) आणि त्यात एकारांत (म्हणजे आधीच मर्कट तशातही मद्य प्याला अशी अवस्था), म्हणूनच पैसे वाचवण्याकरता ही सगळी घाई. काहींना का कंजूषपणाही वाटू शकेल. पण बऱ्याचशा परदेशस्थ देशी आणि एकारांत अतिउच्च बुद्धिमत्तेच्या लोकांची समजूत पटली असेल. कारण शेवटी हे पटायला, तेथे पाहिजे जातीचे.

आता संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी ह्या न्यायाने माझ्या लायसन्ससाठी गाडीपासून तयारी सुरू करणे आवश्यक होते. इंटरनेटवर बरीच शोधाशोध करून स्वस्तोत्तम अशी एक गाडी भाड्याने देणारी कंपनी शोधून एक गाडी परीक्षेच्या दिवसापुरती भाड्यावर घेण्याचे ठरवले. त्या कंपनीला तसे कळवले. परीक्षेसाठी फी भरली आणि वेळ घेतली. आता सगळी तयारी झाली. दिवसामागून दिवस गेले आणि शेवटी परीक्षेचा दिवस उद्यावर येऊन ठेपला.

(क्रमशः)

रिमिक्स आणि आपण..

              अभिजात संगीताची पार्श्वभूमी लाभलेल्या भारतासारख्या देशात आज संगीताची चाललेली ससेलहोलपट म्हणजे अतिशय गंभीर बाब बनली आहे. ज्या देशाच्या इतिहासात स्वतःच्या गायकीने दीप प्रज्वलित करणारा तानसेन होऊन गेला त्याचा वर्तमान असा असावा यापेक्षा वेगळं दु:ख आणखी काय असेल? ज्यांनी संगीतासाठी आपलं उभं आयुष्य वेचलं, त्यांच्या संगीताचा पाठपुरावा करणं ही गोष्ट तर दूरंच पण तो ठेवा आपण जपूनही ठेवू शकत नाही.

एक थरारक अनुभव... (भाग दुसरा)

असो, किंबहुना आपण ठरल्या ठिकाणाच्या अगदीच जवळ आहोत आणि उद्या काय ते बघून घेता येईल असा विचार करून सगळे जण खाली उतरलो. अगदी दहाच पावले चाललो असु आणि आम्हाला दुसरा धक्का बसला...

ठरलेल्या जागेवर प्रचंड दुर्गंधी पसरली होती. जवळच असलेल्या छोट्याशा तळ्याची अवस्था तर बघवत नव्हती. काठावर एक बैल मरून पडला होता. तळ्याकाठी तंबू टाकून राहणे केवळ अशक्य वाटत होते. काय करायचं असा प्रश्न पडला. आणि इतक्यात "ट्टॉक" असा आवाज झाला. शिऱ्याला काहितरी भन्नाट आयडिया सुचलीय ह्याची सगळ्यांनाच कल्पना आली. लहानपणी टीव्हीवर 'फ़ास्टर फ़ेणे'  बघुन शिऱ्याला लागलेली सवय आजतागायत कायम होती.