मस्कतमध्ये 'गोनू' वादळ - ३ (अंतिम)

घरी आल्यावर दूरचित्रवाणी संच चालू करायचा म्हंटले तर तोही बाहेरच्या जगाशी संपर्क तुटल्यामुळे बापुडवाणा चेहरा करून कोपऱ्यात उभा होता. चहा पीता-पीता गप्पा मारीत बसलो होतो आणि वहिनींनी माहिती पुरविली, 'घरातल्या नळाला पाण्याचा थेंबही नाहिए.'

नारायणगांव

.
"नाऱ्यांगाव"
.
"ना रा य ण गां व" असं लांबचक म्हणायच्यापेक्षा "नाऱ्यांगाव" किंवा त्यातहि सुधारित आव्रुत्ति म्हणजे "नारांगाव"
.
आठवडी बाजारालायेणाऱ्या साऱ्या जुन्नरिंच्या तोंडवळनी पडलेलं. त्याचा प्रत्यय दर शनिवारि चांगलाच येतो.
.
पुण्यात नव्यानेच आलेला एकजण दत्त दर्शनासाठि आपल्या बाईक वर चक्क ८० किलोमीटरचा प्रवास करुन या नाऱ्यांगावला आला तेव्हा त्या बेट्याला "नारायणपुर" आणि "नाऱ्यांगाव" हयातला फरक काय तो आयुष्यभरासाठि कळला. "निरा प्यायची ईच्छा आन चुकुन ताडिच्या दुकानात घुसल्यासारखी ससेहोलपट झाली" अशी भावना त्या सभ्य म्हणवुन घेणार्या माणसाची?
.
आता नारायणगड जवळ आहे म्हणुन "नारायणगाव" असा माझा समज आहे, पण त्याहिपेक्षा "गणपीर" डोंगर जास्त जवळ असताना "नारायणगड"च का? हे मला अजुनही न सुटलेल कोड आहे.
.
गावाला वेढा देवुन जाणारी मीना नदि म्हण्जे "घाण" वाहुन नेण्यासाठि व लोकांनी "घाण" करण्यासाठि आहे ह्याचा प्रत्यय नदिच्या कडेने हिंडल्यानंतरच येतो. प्रत्येक गावाला गावकुशीचा रस्ता असतो ज्याला सुशिक्षित "बायपास" व गावकरी "गोखाडिचा रस्ता" म्हणतात तो नारांगावात नेमका कुठे आहे ह्याचा मात्र गोंधळ आहे.

हसा पण लठ्ठ होऊ नका

 एका बाईने दुसऱ्या बाईला विचारले, " तुम्हाला मुले किती? "  उत्तर आले " ६ मुलगे " परत प्रश्न " मोठ्याचे नाव काय? " उत्तर आले, सर्व मुलग्यांची नावे केवीन. "

" मग तुम्ही प्रत्येकाला बोलावता कसे ? ' परत प्रश्न. " ग़ोंधळ उडत असेल ?. "

" छे, छे, आडनावे निरनिराळी आहेत ना '

अभिजात म्हणजे काय?

मला नेहमी प्रश्न पडतो अभिजात म्हणजे काय? त्याचे निकष नेमके काय? ते कोणी ठरविले? समाजानिहाय अभिजात आवडी-निवडी वेगळ्या असतात काय? उदाहरण द्यायचे झाले तर किशोरी अमोणकर यांचे गायन आवडणे ही अभिजात आवड झाली, पण आनंद शिंदेची गाणी ऐकणे ही आवड अभिजात नाही का?  गझल ऐकणे अभिजात, पण लावणी ऐकायला फडात बसणे अभिजात नाही का? जी गोष्ट एका मोठ्या समुदायाला आवडते तिला खालच्या दर्जाची किंवा अभिरुचिहीन कसे ठरविता येईल? शास्त्रीय संगीत केवळ काही लोकांना आवडते म्हणून ते अभिजात असेल आणि ते लोकही त्याला सोपे न करता त्यांच्यापुरतेच मर्यादित ठेवत असतील, तर अभिजात आवडीचे वर्तुळ विस्तारणार कसे? तसे नसेल तर अभिजात आवडी-निवडी या मर्यादित समुदायापुरत्याच असतात का?  लोकसंगीत ऐकले तर ती आवड अभिजात समजली जात नाही, पण त्याच लोकसंगीताची चाल, ठेका उचलून एखाद्या गाण्यात वापरला की ते गाणे अभिजात कसे होते?
दुसरा मुद्दा. अभिरुची प्रत्येक कलेनिहाय वेगवेगळी असते का? म्हणजे शास्त्रीय संगीत ऐकणारा वाचनात मात्र सुहास शिरवळकर वाचत असेल तर त्याला अभिरुचिहीन ठरवायचे का? किंवा चित्रकलेच्या बाबतीत अमूर्त चित्रकला आवडत ( वा कळत) नसेल पण त्याची इतर कलांतील अभिरुची उच्च असेल तर केवळ चित्रकलेच्या मुद्द्यावरून त्याला अभिरुचिहीन ठरवायचे का? की अभिरुची ही नैतिकतेसारखी समाज वा कालसापेक्ष आहे? म्हणजे समाज किंवा काळ बदलला की अभिरुची बदलते? तुम्हाला काय वाटते?

... आणि शकुंतलाबाईंच्या मुलीला न्याय मिळाला

महाराष्ट्रातील बचतगटाच्या चळवळीने ग्रामीण भागातील महिला रणरागिणी बनल्या. अन्यायाला वाचा फोडू लागल्या. प्रतिकार करू लागल्या. सासरी छळ होणाऱ्या नवविवाहितेला न्याय मिळवून देऊ लागल्या. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णापूरमधील शकुंतलाबाई अभंगे.

शकुंतलाबाई या पस्तिशी उलटलेल्या महिला कृष्णापूरमधील अंबिका स्वयंसाह्यता गटाच्या सदस्या आहेत. त्यांना लिहिता-वाचता येते. बचतगटाच्या साह्याने त्यांनी आपल्या मुलीचीच सासरच्या छळापासून सुटका केली, इतके बळ त्यांच्यामध्ये आले. बचतगटात येण्यापूर्वी त्या इतर चारचौघींसारख्याच होत्या. घर आणि शेतीची कामे यापलीकडचे विश्‍व त्यांना माहीत नव्हते. जेव्हा त्यांच्या गावात बचतगट स्थापन झाला, तेव्हा दरमहा त्यात रक्कम कशी भरावी, हा त्यांच्यापुढे प्रश्‍न होता.

बचतगटातील इतर महिलांच्या अनुभवामुळे त्यांनीही बचतगटाची सदस्या व्हायचे असे ठरवले आणि त्या दरमहा ठराविक रक्कम बचतगटात गुंतवू लागल्या. हळूहळू कष्टाने मिळवलेले पाचशे रुपये बचतगटात त्यांच्या नावावर जमा झाले. आता अडीअडचणीला कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत या कल्पनेने त्यांना समाधान वाटले.

त्यांना बचतगटात जाण्यास उत्साह वाटू लागला. पैशांची बचत सुरू झाली होती, पण त्यांच्यामागचा अडचणींचा ससेमिरा काही संपला नव्हता. पावसामुळे त्यांच्या शेतीचे नुकसान झाले होते. त्यामुळे घरात पैसे शिल्लक नव्हते. अशातच मुलीचे लग्न ठरले होते. लग्नासाठी पैसा कोठून उभा करायचा, हा त्यांच्यापुढील मोठा प्रश्‍न होता. बचतगटातील महिलांना शंकुतलाबाईंची ही समस्या समजली आणि त्यांनी गटाच्या माध्यमातून शकुंतलाबाईंना मदत करायची, असे ठरवले.

बचतगटातील महिलांनी शकुंतलाबाईंना धीर दिला आणि गटामार्फत मुलीच्या लग्नासाठी त्यांना कर्जाऊ रक्कम दिली. तसेच मुलीच्या लग्नासाठी आहेरही दिला. शकुंतलाबाईंच्या मुलीचे लग्न पार पडले. शकुंतलाबाईंच्या डोक्‍यावरचे ओझे कमी झाले. लग्नासाठी गटाकडून कर्जाऊ रक्कम घेतल्यामुळे बॅंकांचे व्यवहार त्यांना माहीत झाले. आपण हे व्यवहार करू शकतो याबाबत त्यांना आत्मविश्‍वास आला. याशिवाय बचतगटातील महिला इतर समारंभांमध्येही हिरिरीने भाग घेऊ लागल्या.

एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतल्यामुळे त्यांना आपण चारचौघांत बोलू शकतो याबाबत आत्मविश्‍वास आला. वृक्षारोपणासारखे सामाजिक बांधीलकी राखणारे कार्यक्रम साजरे होऊ लागले. त्याचबरोबर घरगुती समस्यांचीही देवाणघेवाण होऊ लागली. त्याच वेळी शकुंतलाबाईंनाही आपल्या मुलीचा सासरी छळ होतोय ही बातमी शेजाऱ्यांकडून समजली होती. ही माहिती समजल्यावर त्यांनी लगेच मुलीच्या घरी धाव घेतली. तिथे गेल्यावर त्यांची मुलगी तिला होणाऱ्या छळाबाबत मोकळेपणाने बोलली नाही.

त्या वेळी त्यांनी ही समस्या गटासमोर मांडायची असे ठरवले. गटामध्ये महिला विशेष न्यायालयाबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर शकुंतलाबाईंनी मुलीला सासरहून घरी आणले. त्यानंतर तिला सासरी मारहाण झाल्याचे समजले. मुलीशी बोलून तिला त्यांनी धीर दिला आणि गटाच्या मदतीने पोलिस स्थानकात मुलीच्या सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी 498 कलम लावून तिच्या नवऱ्याला आणि सासूला अटक केली. शकुंतलाबाईंच्या मुलीला बचतगटाच्या माध्यमातून न्याय मिळाला. शकुंतलाबाईंनी गटाचे आभार मानले.

इतके करूनच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी उद्योजकतेचे प्रशिक्षण घेऊन गावात हंगामी केळी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. बचतगटामुळे शकुंतलाबाईंच्या आर्थिक उन्नतीला हातभार लागलाच, पण त्यांच्या मुलीला सासरच्या जाचातून मुक्तीही मिळाली.

राम नाम सत्य है

राम राम पाव्हणं. काय म्हनता? आज इथं कुणीकडं वाट चुकलात जणू? आता आलात तसे बसा थोडायेळ. अहो, हिरीत कशाला डोकावून बघताय? पाणी असतं होय हल्ली तिथं? उडी मारलीत तर डोस्कं फुटंल राव उगा. पण गुडघापण डुबणार न्हाई तुमचा. इस्वास नाही माज्यावर? हे बगा. डोकीला जखम दिसत्येय न वं? कालच उडी मारली होती हिरीत. खूप लागलंय बगा. अहो राव, पुन्हा हिरीत बगाया लागला तुम्ही? किती वार सांगू पानी न्हाई इथं.

सुट्टीचे प्लॅनिंग

सुट्टी!! लहानपणीपासून आतापर्यंत केवढया सुट्ट्या आल्या आणि संपल्या पण मला आठवते ते म्हणजे सुट्ट्यांचे 'प्लॅनिंग'. अचाट, अफाट, सुसाट अशा शेकडो टकारांती योजना आम्ही बनवत राहिलो आणि मी तरी अजूनही बनवत आहे. आजच्या पिढीला आधी हे सांगायला हवे की सुट्टीचे प्लान म्हणजे चित्रकलेचा वर्ग, कराटेचा वर्ग, व्यायामाचा वर्ग आणि वर्गमुळात काही नाही असा नसायचा. आणि हापूसच्या आंब्याला लाजवेल एवढ्या चवीने हा चाखला जायचा. परीक्षा जवळ आलेल्या आहेत, अभ्यासाची बोंब लागली आहे, सर्वविषय-वासनांचा वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्याग झालेला आहे, कोणते धडे यावेळी मानगुटीवर बसले आहेत हे शोधण्याची धडपड चालू आहे अशी परिस्थिती. नापासांची चिंता करणार्‍या चाटेंचे दर्शन घ्यावे लागण्याइतपत वाईट अवस्था नसली तरी वर्गातली थोडी अब्रू जपणे तर भाग होतेच. आता टवाळक्या पुरे, आता फक्त अभ्यास. अर्जुनाच्या एकाग्रतेने मी पोपटरूपी अभ्यासावर नेम धरायचो. अभ्यास एके अभ्यास. माझ्या त्या एकाग्रतेने आणि निष्ठेने इंद्रालाही आपले स्थान डळमळीत झाल्यासारखे वाटायचे बहुदा. आणि लगेच 'सुट्टी' नामक अप्सरेची माझ्या बालमनाला भुरळ घालण्याच्या कामी नियुक्ती व्हायची. घरात, रस्त्यात, शाळेत, मैदानात कुठेही ही अप्सरा प्रकटायची आणि आईचा राग, रस्त्यातला खड्डा, सरांचा खडू किंवा एखादे जोरदार "आऊट" तिला बाद करेपर्यंत ती पिच्छा पुरवायची.

वैचारिक खाद्य

हे माझे विचार नाहीत, कोठे वाचलेत आठवत नाही, सहजच जुनी टीपण वही चाळत असताना दृष्टीस पडले, वाटले आपल्या बरोबर शेअर करूयात...

१. तुम्ही उसळणाऱ्या लाटांना थांबवू शकत नाही, पण त्या लाटांवर स्वार व्हायला शिकू शकता.

त्रिमिती

  त्रिमिती

      जीवनातल्या एखाद्या अनुभवावर आधारित निरीक्षण मांडायच ठरवल की लगेच जाणकार नाण्याची दुसरी बाजू आपल्या समोर ठेवातात.  कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू समोर येणे ही अभिनंदनीय गोष्ट आहे पण ती चूक की बरोबर म्हणून होणारा वादही मग अटळ आहे. कोणतीही गोष्ट मनात आली की अमूक म्हणजेच बरोबर आणि बाकी सर्व चूक असा 'बुलियन' तर्क आपल्या मनात का बरे येतो?त्याला कारण आहे आपली परंपरागत विचारसरणी.   पेहराव, भाषा, आहार, संस्कृती, कला, साहित्य सगळीकडे आपण अशी विचारसरणीच का ठेवतो?नाण्याच्या तिसऱ्या बाजूचा विचार का होत नाही?खर सांगायच तर नाण्याची ही तिसरी बाजू अस्तित्वात आहे, नकळत आपण तिचा स्वीकार केला आहे फक्त तिचे असणे अजून अंधारातून बाहेर आलेले नाही.