मी अमेरिके मध्ये ह्या वेळेस आल्यावर मला एक अजब वल्ली भेटली. तसे मला नेहमीच विचित्रा माणसे भेटत गेली आहेत. प्रत्येक ट्रिप मध्ये तसे मला कुणी कुणी विशेष माणसे भेटत आली आहेत. कधी Airport वर तर कधी फ्लाईट मध्ये, कधी जिथे stop over असेल तिथे तर काही office मध्ये, कधी रेस्टोरेंट मध्ये, तसे आपण जर आपल्या आजूबाजूला नीट लक्षा देऊन बघितले तर आसे बरेच नमुने आपल्याला भेटतात, फक्त आपण लक्षा द्यावे लागते, तुमच्या आजू बाजूला लोक कसे राहत आहेत, कसे वावरत आहेत, कोण कसा बोलतो, कसा चालतो, हे जर तुम्ही नीट बघितले तर खूप मजा वाटते की लोक कसे वागतात, त्याच्या सवयी काय आहेत.
ह्या वेळेची ट्रीप काही विशेष आहे. कारण ह्या वेळेस भेटलेली वल्ली म्हणजे ह्या भूतलावर असलेले एक अजब रसायन आहे. आमच्या कंपनी च्या Guest House मध्ये एक व्यक्ती राहत होती. ती व्यक्ति भारतीय होती. आम्ही बरेच दिवस बरोबर राहिलो आणि काही अजून मित्र पण बरोबर राहायचे. त्याचे नाव मी काही इथे घेत नाही. त्याचे बद्दल सांगायचे म्हणजे तो कधीच अंघोळ करायचा नाही. मी त्याच्या बरोबर 2 महिने राहिलो पण दोन महिन्या मध्ये मी एकदाही त्याला अंघोळ करताना बघितले नाही, आणि, जे कपडे तो घरी घालायचा तेच कपडे त्यांनी 2 महिने घातले. कपडे सुद्धा त्याने कधी धुतले नाही. बाहेर जायचा तर रोज एकच ड्रेस घालायचा, दोन महिने त्याने एकच ड्रेस बाहेर जाण्या करिता घातला. म्हणजे त्याने दोनच ड्रेस वापरले, एक बाहेर जायला आणि एक घरात घालायला.
तो सकाळी रोज 7 ला उठत आसे. उठल्या उठल्या तो पहिले काहीतरी खात आसे. खाणे पिणे ज़ाले की स्वारी परत बेड वर ताणून देत आसे. मग साहेब डाइरेक्ट 11 वाजता उठत. परत एकदा किचन मध्ये जायचे आणि दाबून खायचे आणि मग बेडरूम मध्ये जायचे आणि इंटरनेट वर काहीतरी टाइम पास करायचा, गाणे ऐकायचे, तो पर्यंत 2 वाजायचे मग साहेबांना परत भूक लागायची, परत एकदा स्वारी किचन मध्ये यायची. जेवण करायची आणि मग परत एकदा बेडरूम मध्ये जायची आणि मस्त ताणून द्यायची. मग स्वारी डाइरेक्ट 6 वाजता उठायची आणि मग जरा काहीतरी चहा ब्रेड खायची आणि मग बाहेर चक्कर मारायला जायची. माज़ा एक Room Mate होता त्याचे आणि त्या वल्ली चे खूप चांगले जमायचे, मी तर काही त्याच्याशी बोलत नव्हतो कारण त्याची स्वच्छता बघून मला त्याच्याशी बोलायची इच्छा च होत नव्हती. ते दोघे रोज फिरायला जायचे. आणि मग फिरून आल्यावर जेवण बनवायचे काम सुरू व्हायचे. मग बेडरूम मध्ये जेवण केल्यावर ही वल्ली, किचन टिशू ला हात पुसून तो तिथेच किचन टेबल वर टाकायची, त्याला डस्टबिन मध्ये कचरा टाकायची सवयच नव्हती. डिश पण कशी तरी धुवायची अगदी जिवावर आल्यासारखे. आणि मग स्वारी पुन्हा एकदा बेडरूम कडे जायची. आसा हा त्याचा रोज चा दिनक्रम होता. Bathroom मध्ये सुद्धा ही वल्ली इतकी घाण करायची की विचारू नका. दिवसातून 50 वेळेला तोंड धुवायला बातरूम मध्ये जायचे आणि सगळे wash basin घाण करून ठेवायचे. तो जर आसेच त्याच्या घरी करत असेल तर त्याचे घर कसे असेल ह्या विचारणेच मला कसेतरी व्हायचे.
पण मला एकदा त्याचे घर पाहायला जायचे आहे की हा माणूस कसा राहत असेल त्याच्या स्वतःच्या घरात. मला तर वाटते की त्याला ह्या सगळ्या सवयी लहानपणापासून असाव्यात कारण तुम्हाला एकदा लहानपणी जी सवय लागते ती आयुष्यभर तुमच्या बरोबर राहते. लहानपणी जर वाईट सवय लागली असेल तर मोठे पाणी सुद्धा ती तशीच राहते. जरी तुम्ही तिला घालवायचा प्रयत्न केला तरीही ती जात नाही, त्या करिता, बरेच कष्टा घ्यावे लागतात. पण मला एक समाजात नाही की माणूस इतका कसा घाण राहू शकतो, अगदी पशू सारखा, आणि सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे तो रोज 4 वेळेस दाबून खायचा. आणि ते पण त्याच्या बेड वर बसून जेवण करायचा. ह्या दुनिया मध्ये कसे कसे लोक असतात.