सध्या मी आणि माझा मित्र बेंगलोरमधे आहोत. कालचीच गोष्ट, आम्ही एका एटीएम बाहेर रांगेत उभे होतो. बराच वेळ झाला, आत एक मुलगी काय करत होती देव जाणे. इथे कोणाला मराठी कळतयं, म्हणून माझा मित्र मोठ्याने म्हणाला "अरे ही एटीएम मधून पैसे काढतीये का एटीएम तयार करतीये ? ", मी म्हंटलं " अरे हळू बोल ". . तेवढ्यात ती मुलगी हसत हसत बाहेर आली आणि म्हणाली "मला मराठी कळतं". इकडे आमच्या मित्राचा चेहेरा एकदम फोटो काढण्यालायक ! मी मनात म्हटलं 'नशीब, हा एव्हढच बोलला होता, अजून काही कमेंट केल्या नाहीत, नाहीतर . . '
तेव्हा पासून आम्ही मराठीपण जपून बोलतो.
परप्रांतात किंवा परदेशात असं तुमच्या सोबत कधी झालंय ?