लोकल गोष्टी
- लोकल प्रवास
- १. फर्जाना यादव
- ३. नटवर
- २. हातातला खजिना
- ४. माझ्या समोर बसलेली ती;
- ५. आईचा मुलगा हरवला..
- ६. गर्दीतले चेहरे..
- ७. ओळख; पहीली आणि शेवटची.
- ८. मैत्री एक्सप्रेस
- ९. दहशत
- १०. मेलडी
- ११. भिकारी पोट्टा
- १२. लेडीज कंपार्टमेंट आणि पुरुष प्रवासी
- १३. मरणघाई
- १४. नव्या जगात प्रवेश
- १५. बोलपाखरं
- १६. हादरे)
- १७. काही नमुने..
- १८. नावड
- १९. शहाण्या आणि वेड्यांच्यातलं अंतर
- २०. हाता तोंडाची गाठ
- २१. अंधाऱ्या बोळाच्या टोकावर
- २२. पहिली खेप
- २३. संकेत पौर्णिमेचा
- २४. "गॉड ब्लेस यू..! "
- २५. तिखा चटणी मिठा चटणी
- २६. असाही दहशदवाद
- २७. वेगळा-वेगळा
- अच्छा तो हम चलते है..! ( लोकल गोष्टी-२८)
आपला दिनक्रम किती आखीव-रेखीव असतो नाही.. (कामांचाच नाही तार खाण्यापिण्याचाही) उठलं की आवरून चहा प्यायचा.. सोबत बिस्किटं, झालंच तर नाश्ता.. एक-दोनच्या दरम्यान जेवण.. साडेतीन चार वाजले रे वाजले की परत चहा.. पाच सहा वाजता तोंड खवल म्हणून काही तरी वरखाणं.. रात्री नऊ-दहाच्या आसपास परत जेवणं. सगळं कसं एकदम वक्तशीर.. या सगळ्यात खरंच भूक लागून आपण कितीदा खातो-पितो..? भूक अशी आपण कधी अनुभवली आहे का..? अगदी उपवासाच्या दिवशीचा ही आपला आहार आठवून बघितला तरी.. (साबुदाण्याची खिचडी, वरीच्या दाण्यांचा भात, शेंगदाण्याची आमटी, दह्यातला साबुदाणा, साबुदाण्याची खीर, पाकातली रताळी, रताळ्याचा हालवा, बटाट्याची पांढरी भाजी, राजगिऱ्याच्या पुऱ्या, फळं, वेफर्स.. हूऽऽऽ करावी तेवढी यादी थोडीच. ) खाण्यापिण्याची रेलचेल असते.
कधीही कुठल्याही हॉटेलात बघा कायम भरगच्च गर्दी दिसते.. खानावळी, रस्त्यावरचे ठेले.. फिरते विक्रेते, प्लॅटफॉर्मवरची दुकाने.. कधीच रिकामी असत नाहीत. रस्त्यात.. प्लॅटफॉर्मवर.. लोकलच्या डब्यात बघावं तिथे हाता-तोंडाच्या भेटी घडत असतात.. आणि त्याच वेळी अर्ध्यामुर्ध्या लक्तर झालेल्या कपड्यांतले आशाळभूत डोळे हात पसरून पोट वाजवून भीक मागत असतात.
भीक मागणं हा धंदा आहे.. त्यासाठी लहान लहान मुलांना पळवून त्यांचे हात, पाय तोडून, डोळे फोडून रस्त्यावर सोडलं जातं.. या भिकाऱ्यांची बॅंकेत खाती असतात.. कोणी एका माणसानं भीक मागायचा भांडवलाशिवायचा धंदा करून चांगल्या एरियात आपल्या मालकीचे दोन प्रशस्त फ्लॅट घेतले काय आणि काय.. आपण रोज ऐकत बोलत असतो. आपल्यासाठी तो विषय तिथेच संपलेला असतो.!..?
आणि मग एखाद्या दिवशी आपण विषय संपवल्याने न संपलेल्या भुकेचा प्रश्न घेऊन कासाविस कळवळणारे चेहरे भोवती घोटाळत राहतात..
त्या दिवशी तसंच झालं स्वप्ना, कोमल, शिवानी आणि चार्वी दिवसभरातील घडामोडींवर चवी-चवीने चर्चा करत होत्या जोडीला वेफर्स, चीजबॉल वगैरे स्नॅक्स होतच.. ते बघून दोन तीन वेग-वेगळ्या वयांची लहान मोठी उघडी- बागडी, शेंबडी पोर त्यांना कधीची त्रास देत होती.. ( दुर्लक्ष तरी करून करून किती करणार ) शाब्दिक चर्चा, पुस्तकी तत्त्व यातून चेहऱ्यावरची भूक आणि पोटातली वेदना कुठली कळायला.. आणि तसंही उंचावरून बघताना अशा छोट्या मोठ्या गोष्टी दिसत नाहीतच म्हणा. त्यांना पैसे देऊन या धंद्याला प्रोत्साहन देऊ नये असं चौघींचं ठाम मत असल्यामुळे त्या मध्ये मध्ये लुडबूडणाऱ्या मुलांना माशा उडवून लावाव्यात तशा उडवून लावत होत्या.. आणि कितीदा उडवलं तरी उघड्या खाद्य पदार्थांवर माशा जशा येऊन बसतातच तशी ती मुलं वारंवार परत येत होती. विशेष म्हणजे या वेळेस ती पैशांची भीक न मागता खायला मागत होती. जिभेचे चोचले पुरवणाऱ्यांना पोटातली आग ती काय कळणार..?
आतापर्यंत नुसतंच दुर्लक्षून, उडवून लावणाऱ्या त्या मुलींमधली एकीने ( शिवानीने) घोंगावणाऱ्या मुलांच्या त्रासातून सोडवून घ्यायला शेवटचा उपाय म्हणून हात उगारला.. नि तीच संधी साधून दुसऱ्या मुलाने तिच्या हातातील खाऊचा पुडा हिसकावून घेतला. त्यानंतरच त्या तिघांच ते वाटून खाणं, त्यांच्यातल्या लहानग्याला भरवणं, बघण्यासारखं होतं..! (खरंच सगळे भिकारी धंदा म्हणून भीक मागत असतील का? )
हिसकावून घेणं, चोरणं हे केव्हाही वाईटंच.. तरी चूक त्या मुलींचीही होतीच ना..!
.
.
================
स्वाती फडणीस... २०-०२-२०१०