गीत मी गातसे ...

गीत मी गातसे ... ... ...
गीत मी गातसे - गुणगुणत मी असे
हासण्याचा कधी शब्द होता दिला
ह्याचसाठी सदासर्वदा मी  हसे ।ध्रु।

प्रीतिचे आज अनमोल क्षण लाभती
बोल माझे फुलांहून कोमल किती
पुष्पमाला समस्तांस घालीतसे ।१।
सर्वदा मी हसे ...

दीप्ति होईल इतकी, कुणा कल्पना?
ये उजाळा किती मन्मनोदर्पणा
दावितो हा अता स्वच्छ दर्पण असे ।२।
सर्वदा मी हसे ...

टीपा :

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

१. शब्दशः
दावितो हा अता दर्पण नितळ असे
वर लिहिलेली ओळ चालीत जास्त नीट म्हणता येईल.
२. पर्याय : "हासतो मी" असे मी म्हणालो कधी
३. पर्याय : ह्याचसाठी अता सर्वदा मी हसे (हे शब्दशः भाषांतर झाले. मराठेत सदा सर्वदा जास्त चांगले वाटले).

चाल : मूळ गाण्याचीच!   (गालगा - गालगा - गालगा - गालगा (स्रग्विणी? )) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ..असे शी जमवा बरका !