मराठी माणसं अशीच असतात का?

नमस्कार,


मराठी माणसं अशीच असतात का ?, हा प्रश्न मला पडला, जेव्हा मी अमेरिकेतील मराठी आणि इतर भारतीय भाषिक लोकांच्या संपर्कात आलो.


गुजराथी, तमिळ, तेलुगू भाषीय भारतीय माणसं एकमेकांशी कायम त्यांच्याच भाषेत बोलतात, भले त्यांच्याबरोबर आपल्यासारखा परभाषीय असो. या लोकांना त्यामुळे काहीही फरक पडत नाही.


स्पॅनिश, अल्बेनीअन, जॅपनीज, इराकी, चायनीज हे परप्रांतीय लोकसुद्धा आपापल्या भाषेतच बोलतात, शेजारी कुणीही, कसाही मनुष्य असला तरीही.


पण जर २ मराठी बोलत असतील आणि एखादा तिसरा अमराठी त्या ठिकाणी सामील झाला तर !!! लगेच दिसतं की ते दोघे मराठी आता इंग्रजीतून संभाषण करू लागले आहेत....


एवढेच नाही, मनाविरुद्ध असला तरी अमराठी लोक पाठिंबा त्यांच्याच माणसाला देतात, पण मराठी माणसांचा पाठिंबा मुळातच विश्वासहीन असतो, आता शिवसेनेचंच उदाहरण घ्या ना !!


ही परिस्थिती चांगली का वाईट, आशावादी की नैराश्यवादी, मराठीला प्रोत्साहक की मराठी संपवण्याची पुढची पायरी ???


यावर आपली प्रतिक्रिया, आपले अनुभव स्वागतार्ह !!


वरील अनुभव मला स्वतःला आलेले असून मला हा विषय चर्चेसाठी आणून इतरांचे विचार जाणून घ्यावेसे वाटतात.


 


सुदर्शन