मनोगत हे तर अव्वल मराठी संकेतस्थळ आहेच पण याच बरोबर काही इतरही मराठी संकेतस्थळे आपल्या वावरात असतील.
याच माहितीची देवाणघेवाण व्हावी हा या लेखामागचा हेतू.
(पुन्हा : हा विषय पुर्वी हाताळला गेला असल्यास निदर्शनास आणून देणे!)
ईंग्रजीतील सर्वात सुलभ अशा ज्ञानकोशाची मराठी आवृत्ति आपल्या हातभाराच्या प्रतिक्षेत आहे.
ज्ञान व माहितीला बंधने नसावित व हि दोन्ही मुक्तपणे आपल्या मातृभाषेत उपलब्ध व्हावीत या साठी हा प्रयास आहे.
कृपया खालील संकेतस्थळांना आवर्जुन भेट द्या. हि संकेतस्थळे माझी किंवा माझ्या संस्थेची नव्हेत! (असतीतर किती छान ना!)
http://en.wikipedia.org/wiki/Main_Page
सदर विश्वकोष अनेक भाषंत उपलब्ध आहे.
http://mr.wikipedia.org/wiki/Main_Page (मराठी विश्वकोष)
मराठी भाषेतील विकिपीडिआ मध्ये आपले स्वागत आहे. 'विकिपीडिआ' हा एक मुक्त ज्ञानकोश आहे. ही त्याची मराठी आवृत्ती आपण घडवू शकता. मराठी भाषेत 'विकिपीडिआ' संकलित करण्यास हातभार लावा. 'विकिपीडिआ' मध्ये लेखांची भर घालण्यासाठी (संकलित/संपादित करण्यासाठी) मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. तसेच मराठीचा संगणकीय वापर करण्यासाठी देखील हा लेख उपयोगी आहे. सध्या 'विकिपीडिआ' मध्ये लेखांची एकूण संख्या 136 आहे. मराठीभाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिपीडिआ लवकरच प्रगती करेल.
मला भावलेले आणखी एक मराठमोळे संकेतस्थळ :
http://marathiworld.com
अशी अनेक संकेतस्थळे मलाही कळूदेत.
मी आशुतोष