|
दिघू नाईक, खरं नाव दिगंबर असावे पण आम्ही सर्वच त्यांना 'दिघूकाका' म्हणायचो, 'ग' चा अपभ्रंश 'घ' कसा झाला ते त्यांनाही कधी कळले नाही. आई 'दिघूभाऊजी' म्हणायची व दादा (ते समोर नसताना) 'दिघ्या' म्हणायचे ! ही एक वल्लीच होती. एक तासावर एका जागी बसून त्यांनी कधी काम केलेच नसेल. अर्धा पाऊण तास कपडे शिवून झाले की, मग एक चक्कर मारण्याच्या निमित्ताने ते उठत व चांगले तासभर गायब होत. ह्या वेळेत त्यांची 'सोशल' कामेच अधिक होत असत... |