भगवद्गीता अध्याय २,श्लोक २२.

नमस्कार

श्रीभगवद्गीतेचा अभ्यास करत असताना, अध्याय २, श्लोक २२ व्या श्लोकात माझ्या दृष्टीने एक शंका आली. सर्व बंधूभगिनीना हा श्लोक माहिती आहेच, तरी सुद्धा येथे देत आहे.

" वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नर: अपराणि / तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही / श्लोकाचा अर्थ आहे " जसें पुरुष जीर्ण वस्त्र टाकून दूसरी नवीं वस्त्रें ग्रहण करतो, तसेंच जीवात्मा जीर्ण शरीरें सोडून दुसरी नवीं शरीरें धारण करितो."

आतां शंका अशी कीं, जेव्हां एकादा २२ / २३ वर्षांचा तरणाबांड तरूण, अथवा एकादे नवजात बालक जन्मल्याबरोबर स्वर्गवासी होते त्यावेळी हा आत्मा अशी कोरी करकरीत शरीरे कां टाकून देतो.

सूज्ञ, विचारी, जाणकार बंधुभगीनी यावर प्रकाश टाकतील काय?

ग़ुरुजी