विकृत समाजनेते

गेल्या कांही दिवसात वर्तमानपत्रांत ज्या बातम्या येत आहेत त्या अस्वस्थ करुन सोडणाऱ्या आहेत. तुमचे प्रश्न काहीही असले तरी ते सोडवण्याचा हा कुठला मार्ग ?
ऊस जाळणे, दूध रस्त्यावर ओतून देणे, धार्मिक भावना दुखावल्या गेल्या म्हणून रस्त्यावर नंग्या तलवारी हातात घेउन हैदोस घालणे हे विवेकी मनाला न पटणारी कृत्ये आहेत. आपल्या देशातल्या समाजाला झाले आहे तरी काय?
तरुणवर्गाला हे जे चालले आहे याची काही फिकीर आहे का ? त्यातल्या बहुतांशी तरुणांची अवस्था तर 'झूम बराबर झूम' अशी झाली आहे असे त्यांच्या वागण्यावरुन वाटते. जे तरुण यापासून दूर राहून आदिवासी भागात जाऊन खरी समाजसेवा करत आहेत त्यांना जास्त प्रसिद्धी मिळणे जरुर आहे. पण पत्रकारांना त्यांची (किंबहुना कोणाचीच) पर्वा नाही.
आजच्याच लोकसत्तेमधे  " गोव्यातील मद्यालये बंद : पर्यटकांचे हाल " असे शीर्षक आहे. दारुवाचून कोणाचे हाल होऊ शकतात हे आज नवीनच कळले.
मनोगतवर याविषयी इतरांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ही सुरवात.