मराठी भाषेचे रडगाणे

काही मूलभूत सत्ये

  1. मराठीच ऱ्हास होत आहे ही ओरड कित्येक वर्ष सुरू आहे.
  2. जगात अनेक भाषांचा असाच ऱ्हास होत आहे व त्याबद्दल ओरडही अशीच आहे.
  3. अनेक वर्षांच्या वैचारिक हस्तमैथुनाने (Intellectual masturbation) ने हा प्रश्न सुटलेला नाही.
  4. आर्थिक लाभ असेल तिकडे पळणे ही संस्कृती निदान गेल्या पन्नास वर्षात पूर्व आणि पश्चिम देशात वाढीस लागली आहे.

काही उपाय

  1. मराठी येत असल्यास (मराठी माणसास नव्हे) कामगारास २-५% पगार जास्त देऊ असे धोरण खाजगी मराठी उद्योजकांनी पाळावे.
  2. मराठीत सेवा मागितल्यास प्राधान्य देण्यात येईल अशा पाट्या सर्व खाजगी व्यवसायात लावाव्यात व अमलात आणाव्यात.
  3. मराठीत बोलल्यास वेटर, रिक्शावाला, धोबी, भाजीवाला, दूधवाला इ. लोकांना ५% टीप द्यायचा पायंडा पाडावा.
  4. मराठी बोलणाऱ्या व्यक्तीस बिलमध्ये २% सूट मिळेल अशा पाट्या खाजगी इस्पितळे, वकील, ट्रॅव्हल एजंट्स, इ. लावाव्या व ते धोरण पाळावे.
  5. थोडक्यात समाजाच्या प्रत्येक थरात भाषा आणि आर्थिक लाभ यांची सांगड घालावी.
  6. अमराठी माणसाने मराठीत बोलण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे काम अगदी प्रेमाने व त्वरित करावे उदा. आरक्षण नसताना हॉटेल मध्ये वगैरे टेबल देणे.
  7. शुद्ध मराठीत लिहिणाऱ्या वृत्तपत्रांना मधून मधून भरघोस देणग्या द्याव्या (प्रत्येकी दहा रु. दिल्यासही खूप होतात) व जाहीर सत्कार करावे.
  8. अमराठी लोकांना मराठी भूमीत मराठी होण्यास योग्या वातावरण निर्माण करावे.

जाता जाता

  1. आपल्या हातात कुठलीही आर्थिक प्रलोभने नसतील तर गप्प बसावे.
  2. मारून मुटकून जबरदस्ती केल्यास भाषेविषयी तिरस्कार पसरतो.
  3. हे शासनाचे काम आहे असे वाटत असेल तर भाषेचा ऱ्हास अटळ आहे हे मान्य करावे.
  4. अजूनही "लाभ व भाषा" हे नाते चुकीचे आहे असे वाटत असेल तर देशाटन करावे.
  5. सगळ्यात महत्त्वाचे आपली भाषा समृद्ध व इतर भाषांपेक्षा श्रेष्ठ वगैरे भ्रम असल्यास, डार्विन वाचावा. 

मनकवडा

(व्यक्तिगत रोख वाटलेला काही भाग वगळला : प्रशासक)