धर्माचा अभिमान का बाळगावा?

     पुष्क्ळ माणसे आपापल्या धर्माला खुपच महत्त्व देतात.कांही जण तर प्राणाचेही मोल देतात.उदा:-छत्रपती संभाजी महाराज,त्यानी औरंगजेबाकडून हालहाल होऊन मरणे पत्करले पण हिंदूधर्म सोडला नाही‌. शिवसेना-प्रमुख बालासाहेब ठाकरे ''मी हिंदू आहे,असे गर्वाने सांगायला'' ,सांगतात.धर्माबद्दल कट्टर अभिमान मुस्लिम,ख्रिचन,बौद्ध,शीख,जैन इ‌. सर्वच धर्माचे अनुयायी जगभर बाळगतात.

    जरा बारकाईने,अभ्यासपूर्वक निरिक्षण केले तर ,१)जन्म-प्रक्रीया २)शरिराची रचना ३)मृत्यू ४)आजाराचे प्रकार ५)सुख-दु:खे ६)दारिद्र्य-वैभव या बाबी सर्वत्र समान आहेत.धर्मानुसार यामध्ये  फ़रक पडत नाही.  अपवादालाही असा फ़रक आढळत नाही.

       एका धर्माचे असणे किंवा एखाद्या धर्माचा त्याग करुन,दुसऱ्या धर्माचा स्विकार करणे,यामुळे ही माणसांच्या वैयक्तिक जीवनांत किंवा सामुदायिक जीवनांत अनुकूल किंवा प्रतिकूल फ़रक पडताना दिसत नाही,हे ही सत्यच आहे. अंबानी-बंधू हिंदू आहेत,म्हणून ते कोट्याधिश आहेत,असे नाही.इतर अनेक धर्मातील अनेक व्यक्ती अरबोपती आहेत‌. सचिन तेंडूलकर हे हिंदू असल्यामुळे जगप्रसिद्ध क्रिकेट खेलाडू नाहीत ,कारण इतर वेगळ्या धर्मातील अनेकजण क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध आहेत.

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करुन ,लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्विकारला.यानंतर त्यंच्या वैयक्तिक जीवनात काहीच फ़रक पडला नाही.
त्यांचे आजारपण अधिकाधिक गंभीर होत गेले व शेवटी ते मृत्यू पावले.त्यांच्याबरोबरच हिंदू धर्माचा त्याग करुन ,बौद्ध झालेल्या लक्षावधी लोकांचे जीवनात फ़ार नोठे चांगले बदल झाले नाहीत्. नैसर्गिक आपत्तीमध्ये,लहान-मोठ्या वाहनांच्या अपघातात काही मरतात,काही गंभीर जखमी होतात.एखादे बालक आश्चर्यकारकरित्या वाचते.पण अशा घटनामध्ये धर्म हा घटक महत्वाची भूमिका बजावताना दिसत नाही.कारण मरणाऱ्या व्यक्ती,जखमी होणाऱ्या व्यक्ती,ख्रिश्चन,मुस्लिम किंवा कोणत्याही धर्माच्या असतात. माणसांची उंची,त्वचेचा रंग,सुंदर चेहरे,मुलगा-मुलगी होण्याचे प्रमाण,अल्पायुष्य-दीर्घायुष्य याबाबी  धर्मामध्ये वाटून दिलेल्या नाहीत.या गोष्टी सर्वच माणसांमध्ये आढळतात. धर्माचे नाव धारण करणारी माणसे कमी-जास्त उंचीची,अल्प-दीर्घयषी,सुंदर-असुंदर,काळी-गोरी असतात.

      हसणे-रडणे,आनंदित होणे-दु:खी होणे,यशस्वी-अयश्स्वी होणे,भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल शरिरीक आकर्ष्ण वाटणे,मानवी सहन शक्तीच्यापेक्षा जास्त ताकदवान ,सामर्थ्यवान गोष्टीबद्दल भय,आश्यर्य वाटणे या सर्व बाबी सर्वच माणसामध्ये सारख्याच असतात̮ओभ किंवा स्वत:जवळ जे आहे,ते दुसऱ्या कोणी हिरावून घेव नये म्हणून केली जाणारी सुरक्षितेपोटीची आक्रमकता यागोष्टी सर्व माणसात समान असतात.याबाबी धर्म या स्विकारलेल्या वा जन्माने चिकटलेल्या बिरुदामुळे नाहीत.

      वरील सर्व विवेचन लक्षात घेतल्यावर ,हे स्पष्ट होते की,''धर्म'' शब्द निरर्थक आहे.वर्षानूवर्षे मानव  अकारण हा शब्द स्वत:ला चिकटवून घेतोय.त्यबद्दल व्यर्थ अभिमान बालगून  स्वतःचे जीवन पणाला लावत आहे.इतर माणसांचे जिवित्त-वित्त यांची हानि करत आहे‍ .जगाच्या इतिहासात मागे वळून पाहिले तर धर्माभिमानापोटी अगणित संपत्ती माणसांनी नष्ट केली आहे.

      या पृथ्वीवरील मानवाच्या कल्याणासाठी ,या जगातील काही शहाणी,बुद्धिवान आणि आम्हीच सर्व जगातील ,सर्वांचे कल्याण करू शकतो अशी भूमिका घेऊन अतिविनाशकारी शस्त्रे बनविणारे व स्वतःचे नियंत्रणात ठेवणारी माणसे ,या अर्थहीन ''धर्म'' शब्दाबद्दल काहीच का करत नाहीत?

     सामान्य माणसा.ंनी तरी या धर्म शब्दाबद्दल का अभिमान बाळगावा? आपल्या मनातील काल्पनिक महत्त्व विसरुन जगातील सर्व माणसानी विश्व-ब....ंधूत्वाची वास्त्विकता स्विकारली पाहिजे.तरच मानवाचे कल्याण होऊन पृथ्वीवर कोठेही राहणाऱ्या माणसांना  त्यांचे जीवन सुख,समाधान व शांतीपूर्वक जगता येईल.