विनोदी अनुभव

माझ्या एका परिचिताला टिळक रोडवरुन जाताना आलेला मजेशीर अनुभव. सोयीसाठी त्याचे नाव अनुप समजूया.

अनुप अलका टॉकिज चौकाकडुन स्वारगेट कडे चालला होता.  दुवॉकुर च्या सिग्नलपाशी लाल दिवा होता म्हणून थांबला.  तेवढ्यात एक आजोबा झेब्रा क्रॉसिंग वरून चालले होते.  त्यांनी त्यांच्या हातातली काठी जोरात गाडीच्या टायरवर मारली.  अचानक झालेल्या हल्ल्याने अनुप बावचळला.  त्याला काही समजेना की काय झाल ते. 

अनुप आणि आजोबांमधाला संवाद:

अनुप: काय झाल?

आजोबा: मागे व्हा.  सीमारेषेच्या मागे व्हा.

अनुप: सीमारेषा? कोणती सीमारेषा?

आजोबा: तुम्हाला समजत नाही...... लाल दिवा लागला असताना तुम्ही पुढे जाताच कसे?

झाल अस होत की अनुप लाईनच्या थोडासा पुढे आलेला होता.  त्यामुळे पुढच टायर झेब्रा क्रॉसिंग वर आल होत.

अनुप: सॉरी आजोबा. 

आजोबांनी परत एकदा काठी टायर वर मारली. 

आजोबा: तुम्हाला लायसन्स कस काय मिळाल? 

अनुप: अहो आजोबा, जाऊ द्याना. 

आजोबा: (त्याची वाट अडवून धरत) तुम्हाला वाहतुकीचे साधे नियम पण ठाउक नाहीत?

अनुप: अहो एकदा सॉरी म्हणालो ना. आता काय फासावर लटकवणार आहात का?

अनुप च्या सुदैवाने तेवढयात वाहतुक पोलिस मधे आला आणि त्याची अखेर सुटका झाली.