सासू-सून-नणंद-जावा-भावजयी यांच्यातील भांडणांमूळे भारताचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात!

हे माझे परखड व स्पष्ट मत आहे. भारतीय पुरूष हा त्यामुळेच सुखाने जगू शकत नाही. त्याच्या डोक्यावर असते या भांडणांची टांगती तलवार. सासू हुंड्यासाठी किंवा इतर कारणासाठी सुनेला जाळते! हा भारतीय संस्कृतीचा सगळ्यात मोठा कच्चा दुवा आहे. कायद्याच्या कचाट्यातून आजही अशा प्रवृत्ती सुटतात. आजही सुशिक्षीत कुटुंबात असे घडते. अशी संस्कृती काय कामाची की ज्यात एकत्र कुटुंब पद्धतीत लहानांचे कितीही बरोबर असले तरीही त्यांना चुकीचे ठरवले जाते. मोठे म्हणतील तेच करावे लागते. ही एक शोकांतीका आहे की अशा भांडणांचा फायदा घेवून आज शेकडोंच्या संख्येने सासू-सून मालिका तयार होताहेत आणि त्या पाहिल्या जात आहेत. हे नक्कीच धोकेदायक आहे. यामुळे सामाजिक स्वास्थ्य नक्की बिघडते आहे. ते असे दिसून येत नाही. पण परिणाम नक्की होतो. एकत्र कुटुंब पद्धती केव्हाही चांगलीच पण जर घरातल्या एका विशिष्ट व्यक्तीवर इतरांच्या स्वार्थासाठी अन्याय होतो तेव्हा ... ?

भारत हा देश जोपर्यंत अशा सासू-सून-नणंद-जावा-भावजयी भांडणातून मुक्त होत नाही, तोपर्यंत भारताची प्रगती शक्य नाही. जी सासू ज्या गोष्टींसाठी सूनेला अडवते त्याच गोष्टी मुलीसाठी जावयाने कराव्यात असे मात्र तीला मनापासून वाटते.

उदाहरणार्थ : मुलगा आणि सून कधी थोडे बाहेर जेवायला गेलेत किंवा सिनेमाला गेलीत तर कहर माजतो. मात्र मुलीला जावयाने फिरायला घेवून जावे, सिनेमाला जावे असे मात्र वाटते. ह हा हा !

मग काय कामाची अशी संस्कृती आणि असा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा?

"आपण मोठमोठ्या विविधतेत एकतेच्या गोष्टी करतो. आधी आपण एकाच कुटुंबातील एकाच घरात असणाऱ्या व्यक्तींमध्ये ताळमेळ बसवू शकत नाही तर बाकी कोणत्या विविधतेतील एकतेच्या गोष्टी करून काही उपयोग नाही." हे जवळपास भारतातल्या प्रत्येक कुटुंबात घडते. (असे जर आहे तर सोडून द्या की, असा विचार न करता असे आहे म्हणूनच त्याचा गंभीरतेने विचार करायला हवा असे म्हणायला हवे)

जुनी- नवी पिढी वादावर अनेक चित्रपट/मालिका बनतात. त्यात मुले मोठी झाल्यावर आई वडिलांना त्रास देतात असेच दाखवले जाते. पण ते खरे आहे का? अवतार, बागबान, उमर यासारखे चित्रपट जे दाखवतात ते नक्की खरे असते का? नक्कीच नाही. त्यांना वयोवृद्ध् मंडळींची सहानुभूती मिळवायची असते. मुलांकडची बाजू कोण मांडेल ? त्यावर कोण चित्रपट बनवेल ? दोन्ही बाजूंनी विचार करणारा असा एकमेव चित्रपट (माझ्या माहितीतला) म्हणजे : ...मातीच्या चुली ! 

सासू सून वाद हा जुनी नवी पिढी वाद आहे असे क्षणभर मानले तर, मग समवयीन नणंद, भावजय, जावा यांच्यात खुप पटायला हवे! मग तसे का होत नाही? काय कारणे असतील यामागे? का बनली आहे स्त्रीच स्त्रीची दुश्मन आणि पुरुषांच्या शांततेची मारक?

काय वाटते आपल्याला?