न पाहिले, ना विचार केला

न पाहिले, ना विचार केला, पणास मी प्राण लावला
तुझ्याच चरणात मृत्यु यावा, असाच मज ध्यास लागला ।ध्रु।

मरून जाऊ जळून जाऊ
नि कार्य काही करून जाऊ
मरूनही शांति ना मिळे, तर उरे पुढे मार्ग कोठला? ।१।
न पाहिले, ना विचार केला ...

खुनी कुणाला इथे म्हणावे?
मुके तरी मी कसे रहावे?
म्हणू कुणा पाखरू, कुणा पारधी? सखे सांग तू मला ।२।
न पाहिले, ना विचार केला ...

विडा उचलुनी घरुन निघालो
"न पाठ ही सोडतो" म्हणालो
पिसाट हा प्रेतवस्त्र डोक्यास बांधुनी येथ पोचला ।३।
न पाहिले, ना विचार केला ...

चाल : ध्रुवपद : लगालगागा - लगालगागा - लगालगागा - लगालगा
        कडवे : लगालगागा - लगालगागा (पहिल्या दोन ओळी) तिसरी ओळ ध्रुवपदाप्रमाणे.

(हे हिरण्यकेशी वृत्तासारखे (४ वेळा लगालगागा) वाटते. पण ध्रुवपदात शेवटचा गा गाळलेला आहे आणि कडव्यात ते एकेका ओळीत अर्धेच आले आहे. त्यामुळे अगदी २४ कॅरट हिरण्यकेशी नाही पण निदान २२ कॅरट हिरण्यकेशी म्हणायला हरकत नाही. )

विनंती :


१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.

३. प्रशासक, प्लीज, बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )